Home | International | Pakistan | Pakistan PM Frisked Security Procedure New York

न्यूयॉर्क एअरपोर्टवर घेतली पाक पंतप्रधानांची झडती, लोक म्हणाले हा प्रकार प्रोटोकॉलविरोधी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 28, 2018, 10:31 AM IST

ही रुटीन प्रोसेस असल्याचे सांगितले जात आहे. पण पाकिस्तानातील लोकांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

 • Pakistan PM Frisked Security Procedure New York
  खाकान यांचा हा वैयक्तिक दौरा होता असे सांगितले जात आहे. ते त्यांच्या आजारी बहिणीला भेटण्यासाठी गेले होते.

  न्यूयॉर्क - येथील जॉन एफ केनडी एअरपोर्टवर सुरक्षेच्या नावावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान यांची झडती घेण्यात आली. पाकिस्तान मीडियाने हा दावा केला आहे. ही एक रुटीन प्रोसेस असल्याचे सांगितले जात आहे. पण पाकिस्तानातील लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रकार प्रोटोकॉलच्या विरोधी असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.


  खासगी दौरा असल्याने घेतली झडती?
  - असे सांगितले जात आहे की, काही दिवसांपूर्वी खाकान त्यांच्या आजारी बहिणीला भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते. हा त्यांचा खासगी दौरा होता. पण या दरम्यान ते अमेरिकेते उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंस यांनाही भेटले होते.
  - पाकिस्तान मीडियाचे म्हणणे आहे की, हा खासगी दौरा असला तरी पंतप्रधानांकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे. त्यामुळे त्यांची झडती घेणे चुकीचेच आहे. पाकिस्तानच्या टीव्ही चॅनल्सने झडती घेण्याचा व्हिडिओही प्रसिद्ध केला.


  व्हिडिओमध्ये काय आहे?
  - यामध्ये स्पष्ट दिसत आहे की, पंतप्रधान खाकान यांची झडती घेतली जात आहे. त्यानंतर ते टीशर्ट आणि बेल्ट व्यवस्थित करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर काऊंटरवर कोट सोडून ते बॅग घेऊन निघून जातात.


  पाक-अमेरिकेत सध्या तणाव
  - पाकिस्तानचे पंतप्रधान खाकान यांच्या झडतीपूर्वी अमेरिकेने 7 पाकिस्तानी कंपन्यांना आण्विक व्यापाराच्या संशयात बॅन केले होते.
  - असे म्हटले जात आहे की, अमेरिका पाकिस्तानी सरकारवर व्हिसा बॅनसह इतर अनेक निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे.
  - दहशतवादावर नरमाईची भूमिका घेतल्याने अमेरिकेची पाकवर नाराजी आहे. ट्रम्प प्रशासनाने पाकला दिली जाणारी आर्थिक मदतही रोखली आहे.


  कलाम यांची झडती घेतल्यानंतर अमेरिकेने मागितली होती माफी
  2011 मध्ये माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचीही न्यूयॉर्क एअरपोर्टवर झडती घेण्यात आली होती. पण भारताने यासंदर्भात आक्षेप घेतल्यानंतर अमेरिकेने माफी मागितली होती.


  जॉर्ज फर्नांडिस यांचे कपडे उतरवले होते
  माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांची वाशिंग्टनच्या डल्लास आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2002 आणि 2003 मध्ये स्ट्रिप सर्च करण्यात आले होते. त्यावर त्यांनी त्याठिकाणचे डेप्युटी सेक्रेटरी स्ट्रोब टॅलबॉट यांच्याकडे रागात तक्रार केली होती.


  शाहरुखसह अनेक भारतीयांना घेतले आहे ताब्यात
  - ऑगस्ट 2016 मध्ये शाहरुख खानला अमेरिकेच्या लॉस एंजल्स एअरपोर्टवर ताब्यात घेतले होते. त्याबाबत शाहरूखने स्वतः ट्वीटरवर माहिती दिली होती.
  - अॅक्टर इरफान खानलाही 2008 मध्ये लॉस एंजल्स आणि 2009 मध्ये न्यूयॉर्क एअरपोर्टवर ताब्यात घेण्यात आले होते.
  - 2009 मध्ये नील नितीन मुकेशलाही न्यूयॉर्क एअरपोर्टवर ताब्यात घेण्यात आले होते.
  - 2010 मध्ये भारताचे तत्कालीन हवाई उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांची शिकागो एअरपोर्टवर चौकशी करण्यात आली होती.

 • Pakistan PM Frisked Security Procedure New York

Trending