आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - गल्यात सोन्याची जाड चेन आणि लक्झरी कारच्या गराड्यात दिसणारा हा पाकिस्तानी व्यक्ती आहे जफर सुपारी. रावळपिंडीमधील व्यावसायिक असलेला जफर सुपारी पाकिस्तानी सोशल मीडियातील सेलिब्रिटी असून त्याचे लाखो फॉलोअर्स आणि फॅन आहेत. तक्याच्याबरोबर हमेशा बॉडीगार्ड्सही असतात. जफर यांनी याचवर्षी एका मुलाखतीत सांगितले होते की, तो इंटरनेट सेन्सेशन कसा बनला आणि एवढे लोक त्याचे फॅन कसे बनले.
नावाशी संबंधित सिक्रेटही सांगितले..
- डेली पाकिस्तानला दिलेल्या एका मुलाखतीत जफरने सांगितले की, मी कुठेही जातो तेव्हा मला हे पाहून आश्चर्य होते की, लोकांना माझ्याबाबत एवढे सर्व कसे माहिती असते.
- जफरने सांगितले की, फक्त तीन वर्षांपूर्वी त्याने फेसबुक अकाउंट तयार केले आहे. तो सोशल मीडियामध्ये लक्झरी लाइफस्टाइलचे फोटो शेअर करत असतो. पाहता, पाहता सोशल मीडियावर त्याने मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स झाले आहेत.
- नावात सुपारी लागण्याचे सिक्रेटही त्याने सांगितले. खरे नाव जफर खान आहे, पण त्याच्या मित्राने नावामागे सुपारी लावण्याचा सल्ला दिला होता. कारण ते माझ्या पर्सनालिटीला सूट करते. त्यामुळे असे नाव पडल्याचे जफर म्हणाला.
- जफरने सांगितले, मी काही गुंडा नाही. अत्यंत नम्र व्यक्ती आहे. लोकांना वाईट बोलणे मला जराही आवडत नाही. लहान मुले आणि तरुण मला भेटायला येतात आणि सेल्फी घेतात.
- जफरने त्याच्या भावाच्या लग्नात 500 लक्झरीयस कारचा ताफा काढला होता, त्यावेळी तो सर्वात आधी चर्चेत आला होता.
- भावाच्या लग्नात अनेक लोक त्याने रस्त्यांवर नोटा उधळण्यासाठीच लावले होते. आता तो पाकिस्तानचा सेलिब्रिटी बनला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जफरचे PHOTOS...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.