आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LOC वर भारताच्या अनेक तुकड्या उध्वस्त केल्या, 5 जवानही मारले; पाक आर्मीचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या लष्कराने दावा केला आहे की, त्यांनी लाइन ऑफ कंट्रोलवर कारवाईत भारतीय लष्कराच्या अनेक पोस्ट उध्वस्त केल्या आणि भारताचे पाच जवानही ठार केले. हा दावा एलओच्या तत्ता पानी सेक्टरच्या भागातील कारवाईबाबत करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांत सीमेवर तणाव वाढला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने केलेल्या एका हल्ल्यात कॅप्टनसह चार जवान शहीद झाले होते. 


व्हिडिओ क्लिपही जारी केली 
- पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी गुरुवारी रात्री एक ट्वीट केले. त्यात म्हटले की, आम्ही एलओसीच्या तत्ता पानी सेक्टरमध्ये कारवाई करून भारतीय लष्कराच्या अनेक पोस्ट उध्वस्त केल्या आणि त्यांचे पाच सैनिक ठार केले.  
- त्याचबरोबर गफूर यांनी एक व्हिडिओ क्लिपही जारी केली. त्यात दाखवले आहे की, पाकिस्तान आर्मीने कशाप्रकारे भारतीय पोस्ट्सवर बॉम्बहल्ले करून त्या उध्वस्त केल्या. व्हिडिओमध्ये ते स्पष्ट दिसत आहे. 


सामान्य नागरिकांवर हल्ल्याचा आरोप 
- गफूर म्हणाले की, भारतीय लष्कर पाकिस्तानातील नागरिकांना लक्ष्य करत आहे. त्याच्या उत्तरात ही कारवाई करण्यात आली. ते म्हणाले की, भारताचे पाच सैनिक मारले गेले आणि अनेक जखमी झाले. निर्दोषांवर भारत जे हल्ले करत आहे, त्याला असेच उत्तर दिले जाईल. 
- भारतीय लष्कराने पाकिस्तानचा दावा फेटाळून लावला आहे. त्यापूर्वी पाकिस्तानचत्या आर्मीने आरोप केला होता की, भारतीय लष्कर एलओसीवर नियमांच्या विरोधात जाऊन कारवाई करत आहे. त्यात सामान्य नागरिक प्राण गमावत आहेत. 


भारताच्या उप उच्चायुक्तांना बोलावणे 
- गुरुवारी पाकिस्तानात इस्लामाबादेत भारताचे उप उच्चायुक्त जेपी. सिंह यांना बोलावून घेण्यात आले. त्यात म्हटले की, भारत एलओसीवर विनाकारण फायरिंग करत आहे. फायरिंगमध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचेही म्हटले गेले. 
- पाकिस्तानने आरोप केला की, भारतीय लष्कराने मुद्दाम हल्ला केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...