आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणमधील अपयशाचे खापर पाकच्या माथी नकाे; बाजवा यांनी अमेरिकेला सुनावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- आमचा देश म्हणजे काही दहशतवाद्यांसाठी नंदनवन नाही, असा दावा करतानाच अफगाणिस्तानमधील अपयशाचे खापर पाकिस्तानवर फोडू नका, अशा शब्दांत पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी अमेरिकेला सुनावले आहे.  


युद्धग्रस्त अफगाणिस्तानमध्ये दहशतवादाच्या विरोधातील लढाईत अमेरिकेला अपयश आले आहे. तीनदिवसीय सुरक्षा संमेलनात बाजवा यांनी ही भूमिका मांडली. पाकिस्तानच्या भूमीचा दहशतवादी वापर करत असल्याचा आरोप केला जातो. परंतु हा दावा पूर्णपणे बिनबुडाचा आहे, असे बाजवा यांनी सांगितले. खरे तर अफगाणिस्तानातील सुमारे २० लाखांहून जास्त लोक पाकिस्तानच्या प्रदेशात स्थलांतरित झाले आहेत. ही समस्या मोठी आहे. खरे तर जमात-उल-अहरार, तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान आणि इसिस या संघटनांनी अफगाणिस्तानच्या प्रदेशावर अड्डे बनवले आहेत. हे अड्डे पाकिस्तान सीमेजवळ आहेत, असे बाजवा म्हणाले.  गेल्या महिन्यात ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला दिली जाणारी २ अब्ज डॉलर्सची मदत रोखली. पाकिस्तानला वारंवार सांगूनही दहशतवादाला आश्रय देण्याचे काम पाकिस्तानात केले जात आहे. त्यावरून अमेरिकेने तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

थेट कारवाया, आर्थिक नाड्याही आवळल्या  
पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांच्या विरोधात वेळोवेळी व्यापक कारवाई केली आहे. दहशतवाद्यांची आर्थिक रसद रोखण्यासाठीदेखील अनेक धडक कारवाया केल्या. पाकिस्तानचा दहशतवाद प्रतिबंधक राष्ट्रीय कृती आराखडा आहे. त्याची अंमलबजावणी केली जाते.

बातम्या आणखी आहेत...