Home | International | Pakistan | Pakistan's space program to watch India; Pak will be self-supporting

भारतावर लक्ष ठेवण्यासाठी पाकचा अंतराळ कार्यक्रम; पाक बनणार स्वावलंबी

वृत्तसंस्था | Update - Apr 30, 2018, 03:55 AM IST

लष्करी आणि नागरी हेतूसाठी विदेशी उपग्रहावरील अवलंबित्व कमी करणे आणि भारतावर लक्ष ठेवण्यासाठी पाकिस्तान येत्या आर्थिक वर्

  • Pakistan's space program to watch India; Pak will be self-supporting

    इस्लामाबाद - लष्करी आणि नागरी हेतूसाठी विदेशी उपग्रहावरील अवलंबित्व कमी करणे आणि भारतावर लक्ष ठेवण्यासाठी पाकिस्तान येत्या आर्थिक वर्षात महत्त्वाकांक्षी उपग्रह कार्यक्रम सुरू करण्याच्या तयारीत आहे. अमेरिका व फ्रेंच उपग्रहावरील अवलंबित्व कमी करून या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. २०१८-१९ या वर्षासाठी अंतराळ कार्यक्रमासाठी ४.७० अब्ज रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

    पाकसॅट-एमएम १ कार्यक्रमासाठी १.३५ अब्ज रुपये या निधीतून खर्च केले जाणार आहेत. तिसऱ्या प्रकल्पात कराचीमध्ये स्पेस अॅप्लिकेशन रिसर्च सेंटर स्थापन केले जाईल. पाकसॅट-एमएम १ प्रकल्पाचा एकूण खर्च २७.५७ अब्ज रुपये आहे. केवळ जीपीएस, मोबाइल तंत्रज्ञान व इंटरनेटमुळे याची आवश्यकता भासत नाही, तर बदलत्या स्थितीमुळेही अंतराळ कार्यक्रमाची गरज आहे. या प्रदेशातील असामान्य स्थितीमुळे व्यूहात्मक वातावरणावर परिणाम झाला आहे, असे संरक्षणतज्ज्ञ मारिया सुलतान यांनी सांगितले.

Trending