Home | International | Pakistan | PTI chief Imran Khan said we are ready to sit and discuss on Kashmir

भारताची तयारी असल्यास काश्मीर मुद्दा चर्चेतून सोडवू-इम्रान यांची पहिली प्रतिक्रिया, भारतीय मीडियावर नाराज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 27, 2018, 06:31 AM IST

काश्मिरी अनेक वर्षांपासून त्रास सहन करत आहेत. आपल्याला एकत्र बसून यावर तोडगा काढावा लागेल, असे इम्रान म्हणाले.

 • PTI chief Imran Khan said we are ready to sit and discuss on Kashmir

  इस्लामाबाद- पाकिस्तानी किकेटपटू ते राजकीय नेता झालेल्या इम्रान खानने गुरुवारी आपल्या पक्षाच्या विजयाची घोषणा केली. मतमोजणी सुरू असतानाच टीव्हीवर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्याने आपले सरकार गरिबांचे असेल, असे सांगत चीनशी सलोखा कायम ठेवण्याचे संकेत दिले. भारताशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले जातील, असेही तो म्हणाले. सध्या पाकमध्ये ११९ जागा घेत इम्रानचा पक्ष पीटीआय आघाडीवर आहे. नवाज शरीफ यांचा पीएमएल-एन ६२ जागांवर तर बिलावल भुत्तोंचा पीपीपी ४४ जागांवर आघाडी घेऊन आहे. बहुमतासाठी १३७ जागांची आवश्यकता आहे. इम्रानने भाषणात दहशतवादावर भाष्यच केले नाही.

  २.४७ मिनिटे भारतावर भाष्य... काश्मिरींवर अत्याचार, समोरासमाेर बसून चर्चा करू
  हिंदुस्थानमधील माध्यमांनी मला खलनायकाचे रूप दिले याचा खेद वाटतो. दोन्ही देशांचे व्यापारी संबंध चांगले आहेत. काश्मीर प्रश्न समोरासमोर बसून सोडवला पाहिजे. आजवर फक्त आरोप-प्रत्यारोपच झाले. आम्हाला मैत्री हवी आहे.


  १ मिनिट २७ सेकंद चीनवर...
  चीन आपल्याला संधी देतो, याचा लाभ घेऊ. चिनी मॉडेलच्या आधारे गरिबी दूर करू, भ्रष्टाचार संपवू.


  ५९ सेकंद अफगाणिस्तानवर... दोन्ही देशांतील सीमा खुल्या कराव्या
  अफगाणिस्तानने खूप सोसले आहे. या देशाशी चांगले संबंध हवेत. त्यामुळे दोन्ही देशांतील सीमा खुल्याच असायला हव्यात.


  भारतावर काय परिणाम?
  तज्ज्ञांच्या मते : लष्कर जे सांगेल तेच करेल इम्रान, काश्मिरात गडबड सुरूच राहिल

  इम्रान पंतप्रधान झाले तरी पाकची भारताप्रती भूमिका बदलेल असे राजकीय तज्ज्ञांना वाटत नाही. इस्लामाबादेत भारताचे उच्चायुक्त राहिलेले पार्थसारथी म्हणाले, ‘पाकचे लष्कर जे सांगेल तेच इम्रानला करावे लागेल. तर माजी लष्करप्रमुख दीपक कपूर म्हणाले, ‘पाक छुपे युद्ध बंद करणार नाही. काश्मिरात गडबड सुरूच राहिल.’ माजी राजनैतिक अधिकारी के.सी. सिंह म्हणाले, ‘भारतात १० महिन्यांनी लाेकसभा निवडणुका अाहेत. त्यामुळे भारतालाही पाकशी मैत्री वाढविणे शक्य नाही.’


  हाफिज सईदच्या पक्षाला एकही जागा नाही
  अतिरेकी हाफिज सईद पुरस्कृत अल्लाहू अकबर तहरीक पक्षाला एकही जागा मिळाली नाही. माजी पंतप्रधान शाहिद अब्बासी दाेन्ही जागी पराभूत. ‘पीएमएल-एन’चे शहबाज शरीफ तीनपैकी दाेन जागी पराभूत. पीपीपी प्रमुख बिलावल दाेनपैकी एकाच जागी जिंकले.


  काय म्हणाले इम्रान खान...
  >> पाकिस्तानात लोकशाही बळकट होत असल्याचे हे उदाहरण आहे. अनेक दहशतवादी हल्ल्यांनंतरही निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडली. त्यासाठी सुरक्षा दलांचे आभार.
  >> आपल्याला गरीबीशी लढा द्यावा लागणार आहे. ते सर्वात मोठे आव्हान असेल. चीन हे आपल्यासमोरचे सर्वात मोठे उदाहरण आहे. त्यांनी गेल्या 30 वर्षात 70 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले आहे. lections2018
  >> आधीचे सत्ताधारी स्वतःवर थर्च करायचे, आजपासून ते होणार नाही. आम्ही साधेपणाने राही. एवढ्या मोठ्या पंतप्रधान निवासात राहणार नाही, एखादी लहानशी जागा शोधू. जनतेने भरलेल्या कराचे संरक्षण करू.
  >> भारतीय मीडियाने माझी जी प्रतिमा रंगवली, त्यामुळे मला वेदना झाल्या. भारताबरोबर चांगले संबंध असलेल्या काही पाकिस्तानींपैकी मी एक आहे. जर आपल्याला उपखंडातून गरीबी दूर करायची असेल तर आपल्यामध्ये चांगले व्यापारी संबंध असायला हवे.
  >> काश्मिरी अनेक वर्षांपासून त्रास सहन करत आहेत. आपल्याला एकत्र बसून यावर तोडगा काढावा लागेल. जर भारतीय नेतृत्वाची तयारी असेल तर दोन्ही देश मिळून चर्चेतून हा मुद्दा सोडवू शकतात, संपूर्ण उपखंडासाठीच ते फायद्याचे असेल.

Trending