इम्रानची पहिली म्हणाली-माझ्या / इम्रानची पहिली म्हणाली-माझ्या मुलांचा पिता पंतप्रधान बनणार, दुसरीने असा मारला टोमणा

इम्रानची पहिली म्हणाली-माझ्या मुलांचा पिता पंतप्रधान बनणार, दुसरीने असा मारला टोमणा.इम्रानची पहिली म्हणाली-माझ्या मुलांचा पिता पंतप्रधान बनणार, दुसरीने असा मारला टोमणा.इम्रानची पहली म्हणाली-माझ्या मुलांचा पिता पंतप्रधान बनणार, दुसरीने असा मारला टोमणा.

Jul 26,2018 05:28:00 PM IST

लंडन/कराची - माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानतहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान (65) पंतप्रधान बनणार आहेत. त्यासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावही सुरू झाला आहे. त्यांची पहिली घटस्फोटीत पत्नी आणि ब्रिटिश जर्नलिस्ट जेमिमा गोल्डस्मिथनेही ट्वीटरवर इम्रानला शुभेच्छा दिल्या. त्यात तिने इम्रानला तिच्या मुलांचा पिता असे संबोधले. तर दुसरी पत्नी रेहम खानने टोमणा मारला आहे.

जेमिमाने तिच्या ट्वीटमध्ये लिहिले, अपमान, अडथळे आणि बलिदानाच्या 22 वर्षांनंतर माझ्या मुलांचे पिता पाकिस्तानचे आगामी पंतप्रधान बनणार आहे. इम्रानला शुभेच्छा..!


'क्लीन स्वीप' ची आठवणही जागवली
जेमिमा दुसऱ्या एका ट्वीटमध्ये जुन्या आठवणीला उजाळा दिला. तिने लिहिले, इम्रानची 1997 ची पहिली निवडणूक लक्षात आहे. तेव्हा इम्रान राजकारणात नवीन होता. मी 3 महिन्यांचा मुलगा सुलेमानला घेऊन देशभरात फिरत होते. लाहोरमध्ये मी इम्रानच्या फोनची वाट पाहत होते. त्याने मला फोन केला आणि म्हणाला क्लीन स्वीप झाले. काही वेळ थांबून हसत म्हणाला, आपल्या विरोधात क्लीन स्वीप म्हणजे पक्ष हारला होता.


जेमिमापेक्षा 22 वर्षांनी मोठा
1995 मध्ये लग्नावेळी इम्रान 43 तर जेमिमा 21 वर्षांची होती. इम्रानला राजकारण आणि कुटुंब यांचा समन्वय साधता आला नाही आणि त्याचा घटस्फोट झाला. 2004 मध्ये घटस्फोटानंतर जेमिमा दोन्ही मुलांसह लंडनच्या घरी निघून गेली. घटस्फोटानंतरही त्यांचे नाते चांगले असल्याचे म्हटले जाते.


विजयावर आश्चर्य कशाला
इम्रानची दुसरी पत्नी रेहम खानने ट्वीटमध्ये लिहिले, हे तर होणारच होते. याच एवढे आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. एका रिट्वीटमध्ये इम्रानला टोमणा मारत रेहमने लिहिले, फक्त लग्न लपून लपून करतो. इम्रान एका पोलिंग बूथवर मतदान केल्यानंतर सही करतानाच एक फोटो ट्वीट झाला होता. त्यावर रिट्वीट करताना रेहमने अशी प्रतिक्रिया दिली.


तीन लग्न
इम्रान खानने रेहम खानबरोबर 2015 मध्ये लग्न केले होते. वर्षभरात त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर यावर्षाच्या सुरुवातीलच इम्रानने बुशरा बरोबर तिसरे लग्न केले होते. दोघांच्या वयामध्ये 25 वर्षांचा फरक आहे.

X