आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये आहे शहीद भगतसिंहांच्या पूर्वजांचे घर, आता दिसते असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहीद भगतसिंह यांचे घर पाकिस्तानात आहे. - Divya Marathi
शहीद भगतसिंह यांचे घर पाकिस्तानात आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास भगतसिंहांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना या वीर सुपूत्राने हसत-हसत फासावर जाणे स्वीकारले होते. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव या तीन क्रांतिकारकांना ब्रिटीश शासनाने फासावर लटकवले होते. या घटनेला आता 87 वर्षे होत आहे. मात्र आजही आमच्या मनात आणि स्मरणात भगतसिंह आहे. भगतसिंहांचा जन्म ज्या ठिकाणी झाला, आणि जिथे त्यांचे बालपण गेले ते घर आजही आहे. ते घर आता पाकिस्तानात आहेत. 

 

- भगतसिंहांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी फैसलाबाद जिल्ह्यातील जरांवाला तालुक्यातील बंगा गावात झाला होता. त्यांचे पूर्वज महाराजा रणजीतसिंगांच्या लष्करात होते. 
- त्यांचे वडील आणि  काका गदर पार्टीचे सदस्य होते. हा पक्ष ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीविरोधात क्रांतिकारी आंदोलन करत होता. 
- याचाच परिणाम लहान भगतसिंहांवर झाला. त्यांच्या मनात ब्रिटिश शासनाबद्दल एवढा विरोध निर्माण झाला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनीही क्रांतीचा मार्ग निवडला. 
- तरुण वयात भगतसिंह हिंदूस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य झाले. या संघटनेत चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल आणि सुखदेव सारखे महान क्रांतिकारी होते. 
- देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना ब्रिटीश शासनाने फासावर लटकवले. या घटनेने संपूर्ण देशाला धक्का बसला. 
- भगतसिंह आणि त्यांच्या सहकारी हसत-हसत फासावर चढले, त्यांनी इन्कलाब झिंदाबादचा नारा बुलंद केला होता. 

 

पाकिस्तानमध्ये आहे घर 
- शहीद भगतसिंह यांचे पिढीजात घर आजही पाकिस्तानमध्ये आहे. त्यांचा जन्म फैसलाबादमधील बंगा गावातील 105 जीबी क्रमांकाच्या घरात झाला होता. 
- चार वर्षांपूर्वीच या घराला हेरिटेज घोषित करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी ते सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. 
- फेब्रुवारी 2014 मध्ये फैसलाबादचे जिल्हा समन्वयक नुरुल अमीन मेंगल यांनी या घराला हेरिटेज दर्जा दिल्यानंतर त्याच्या संरक्षण आणि देखभालीसाठी 5 कोटी रुपये दिले होते.
- यानंतर भगतसिंह यांचेच घर नाही तर त्यांचे संपूर्ण गावच पर्यटनस्थळ म्हणून विकसीत केले गेले होते. 
- फाळणीनंतर एका वकिलाने भगतसिंहांच्या घरावर कब्जा केला होता. वकिल आणि त्याच्या वारसांनी भगतसिंह यांच्या संबंधीचे सामान अनेक दशक जपून ठवले होते. 
- भगतसिंहाच्या घरातील या सामानामध्ये त्यांच्या आईचे काही साहित्य होते. दोन लाकडी ट्रंक आणि एक लोखंडी अलमारी होती. 
- आता हे सर्व सामान घरावर प्रशासनाचा ताबा आहे. 
- त्यांच्या गावात दरवर्षी 23 मार्चला त्यांच्या शहीद दिनी सरदार भगतसिंह मेळावा आयोजित केला जातो. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, भगतसिंहाचे पाकिस्तानातील घराचे दुर्मिळ फोटो...