आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शरीफ यांच्यावर बूट फेकला; एक दिवसापूर्वी परराष्ट्रमंत्र्याच्या तोंडाला काळे फासले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- लाहोरमध्ये एक मदरशाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या दिशेने एका कट्टरवादी माजी विद्यार्थ्याने बूट भिरकावला. बूट शरीफ यांच्या खांदा आणि कानाला लागला. घारीशाहू येथील जामिया नइमिया मदरशात रविवारी आयोजित कार्यक्रमात शरीफ सहभागी झाले होते.  


शरीफ भाषण देण्यासाठी डायसकडे जात होते. तेव्हा अब्दुल गफूर नावाच्या माजी विद्यार्थ्याने त्यांच्या दिशेने बूट फेकला आणि तो शरीफ यांच्या जवळ जाऊन ‘लब्बाइक या रसूलुल्लाह’ अशा घोषणा देऊ लागला. नंतर इतर दोन विद्यार्थ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी अब्दुल गफूर व त्याच्या साथीदाराची चौकशी केली. घटनेनंतर तेथील वातावरण तणावपूर्ण बनले. बूट फेकल्यानंतरही शरीफ यांनी आपले भाषण पूर्ण केले. त्यात त्यांनी या घटनेचा काहीही उल्लेख करणे टाळले.  

 

 

ख्वाजा अासिफही लक्ष्य  
परराष्ट्रमंत्री ख्वाजा अासिफ यांच्या चेहऱ्यावर फैज रसूल नावाच्या एका व्यक्तीने शाई लावली. ईश्वरी निंदेशी संबंधित राज्यघटनेतील दुरुस्ती प्रस्तावावरून रसूल नाराज होता. त्या नाराजीतून रसूलने हे कृत्य केल्याचे चौकशीतून कबूल केले. या प्रकरणात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तेहरिक-ए-लब्बाइक पाकिस्तानच्या समर्थकांनी इस्लामाबादच्या फैजाबादच्या चौकात मोठा रास्ता रोको केला होता. त्यामुळे कायदा मंत्री जाहिद हामिद यांनी राजीनामा दिला होता. 

 

शरीफांच्या खांद्यावर लागला बूट
- माजी पंतप्रधान नवाज शरीफ लाहोरच्या जामिया नईमिया मदरशात स्पीच देत होते. त्याचवेळी एक बूट हवेत उडून शरीफांच्या खांद्याला लागला. 
- ज्या विद्यार्थ्याने हा बूट फेकून मारला तो 'लब्बैक या रसूलुल्लाह' च्या घोषणा देत होता. या प्रकरणात दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, बूट मारणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव अब्दुल गफूर आहे. तसेच तो या मदरशातील माजी विद्यार्थी आहे. दुसऱ्याचे नाव माजिद असे आहे.
- धार्मिक संघटना तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानचा आरोप आहे, की पीएमएल-एन आणि नवाज शरीफ यांनी राज्यघटनेत पैगंबर मोहम्मद यांच्याशी संबंधित तारखेत बदल करण्याचा प्रयत्न केला. 
- तत्पूर्वी लाहोरपासून 100 किमी अंतरावर सियालकोट येथे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांच्यावर शाई फेकण्यात आली. 
- शाई फेकणाऱ्याने सुद्दा अशाच प्रकारचा आरोप लावला. ही शाई परराष्ट्र मंत्र्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांमध्ये गेली. तो कार्यकर्त्यांचा मेळावा असल्याने त्या ठिकाणी उपस्थित सर्वांनी मिळून आरोपीची धुलाई केली. यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनास्थळाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...