आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमधील पहिल्या शीख पोलिस अधिकाऱ्याला बळजबरी घराबाहेर काढले, पगडीही काढून फेकली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - पाकिस्तानचे पहिले शीख पोलिस अधिकारी गुलाबसिंह यांना पोलिसांनी लाहोरमधील घरातून मारहाण करून हाकलून लावले. त्यांची पगडीही काढून फेकण्यात आली. गुलाबसिंह पोलिसांना वारंवार विनंती करत राहिले की, ते 1947 पासून या घरात राहत आहेत. त्यांना दहा मिनिटांचा वेळ तरी द्यावा, पण पोलिसांनी त्यांचे काहीही ऐकले नाही. 


एएनआयने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात गुलाबसिंह त्यांची व्यथा मांडत आहेत. गुलाबसिंह या व्हिडिओमध्ये म्हणतात की, मी पाकिस्तानचा पहिला शीख ट्राफिक वॉर्डन आहे. पण मला चोरांप्रमाणे वागणूक दिली जात आहे. मला घरातून ओढत बाहेर काढण्यात आले आणि घराला कुलूप लावले. माझ्या डोक्यावरील पगडी काढून फेकली आणि माझे केसही मोकळे करण्यात आले. 


गुलाबसिंह यांनी तारीक वजीर अॅडिशनल सेक्रटरी आणि पाकिस्तान गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे माजी प्रमुख तारा सिंह यांच्यावर हा आरोप केला आहे. दोघांनी लोकांना खूश करण्यासाठी हे सर्व केल्याचे ते म्हणाले. न्यायालयातही माझ्याविरोधात खटले सुरू असल्याचे गुलाबसिंह म्हणाले. 


पाकिस्तानाच शिखांवर अत्याचाराची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही पाकिस्तानात अल्पसंख्याक समुदायावर अनेक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यात आता शिखांवरही अत्याचार होत असल्याचे गुलाबसिंह यांनी सांगितले आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...