आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाज शरीफ यांच्या घराजवळ तालिबानचा आत्मघातकी हल्ला, 5 पोलिसांसह 9 जण ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घराजवळील चेकपोस्टवर तालिबानकडून आत्मघातकी हल्ला झाला. यात 5 पोलिसांसह 9 जण ठार झाले. 14 पोलिसांसह 25 जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की चेकपोस्ट शरीफ यांच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर आहे. चेकपोस्टजवळ एक धार्मिक कार्यक्रमही सुरु होता. 

 

हल्लेखोर 16-17 वर्षांचा 
- वृत्तसंस्थ्येने दिलेल्या वृत्तानुसार, हल्ला बुधवारी रात्री झाला. पंजाब प्रांताचे आयजी आरिफ नवाज म्हणाले, की हा आत्मघाती हल्ला होता. हल्लेखोर हा किशोरवयीन होता. त्याने चेकपोस्टजवळ स्वतःला उडवून दिले. यात 2 पोलिस इन्स्पेक्टरसह 5 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. जखमी पोलिसांपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. 
- लाहोरचे डीआयजी डॉ. हैदर अश्रफ म्हणाले, हल्लेखोराच्या निशाण्यावर पोलिस जवान होते. त्यामुळे त्याने चेकपोस्टवरच स्वतःला उडवून दिले. घटनास्थळावरुन हल्लेखोराचा मृतदेह जप्त करण्यात आला आहे. चेकपोस्टजवल तबलीगी सेंटर येथे धार्मिक सोहळा सुरु होता. 
- अधिकाऱ्यांनी सांगितले की स्फोट एवढा मोठा होता की त्याचा आावज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकायला आला. 
- काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की तहरीक-ए-तालिबान या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेने पोलिसांवर हल्ल्याचा इशारा दिला होता. 

 

जखमी पोलिसांनी सांगितला 'आंखो देखा हाल'
- जखमी पोलिस आबिद हुसैन म्हणाले, 'मी पाहिले की एक मुलगा इमारतीत घुसण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा आम्ही त्याला आत जाण्यापासून रोखले तेव्हा त्याने स्वतःला उडवून दिले.'
- लाहोरमध्ये पुढच्या आठवड्यात पाकिस्तान सुपर लीगची सेमीफायनल आहे. त्याआधी हा हल्ला झाला आहे. डीआयजी अश्रफ म्हणाले मॅचच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात येईल. 
- आत्मघाती हल्ल्यानंतर पाक रेंजर्स तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण परिसराला वेढा टाकला आहे. 

 

राष्ट्रपतींनी केला हल्ल्याचा निषेध 
- पाकिस्तानचे राष्ट्रपती ममून हुसैन यांनी माजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. 
- दुसरीकडे, पंजाबचे मुख्यमंत्री शहबाज शरीफ यांनी पोलिसांकडून हल्ल्याचा अहवाल मागवला आहे. 
- या वर्षी लाहोरमध्ये झालेला हा पहिला हल्ला आहे. गेल्यावर्षी लाहोरमध्ये अनेक हल्ले झाले होते. त्यात 60 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...