Home | International | Pakistan | Twice firing at the justice's residence in Pakistan

पाकिस्तानमध्ये न्यायमूर्तींच्या निवासस्थानी दोनदा गोळीबार

वृत्तसंस्था | Update - Apr 16, 2018, 02:00 AM IST

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती इजाज उल एहसान यांच्या निवासस्थानी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी काही तासांच्या अं

  • Twice firing at the justice's residence in Pakistan

    लाहोर- पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती इजाज उल एहसान यांच्या निवासस्थानी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी काही तासांच्या अंतराने दोन वेळा गोळीबार केला. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, असे वृत्त ‘डॉन’ ने दिले आहे.


    सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या पाच सदस्यांच्या खंडपीठाने गेल्या वर्षी पनामा गेट प्रकरणाची सुनावणी केली होती त्यात न्यायमूर्ती एहसान यांचा समावेश होता. या पीठाने पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना अपात्र ठरवण्यात आले होते.


    गोळीबाराबद्दल माहिती देताना सर्वोच्च न्यायालयाच्या पत्रकात म्हटले आहे की, बंदूकधाऱ्यांनी पहिल्यांदा रविवारी पहाटे साडेचार वाजता आणि नंतर सकाळी ९ वाजता न्यायमूर्ती एहसान यांच्या निवासस्थानी गोळीबार केला.या घटनेनंतर सरन्यायाधीश मियाँ साकीब निसार यांनी न्यायमूर्ती एहसान यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पंजाब प्रांताच्या पोलिस महानिरीक्षकांना दिले. सरन्यायाधीश संपूर्ण परिस्थितीवर स्वत: लक्ष ठेवून आहेत, असे ‘डॉन’च्या वृत्तात म्हटले आहे. या प्रकरणाचा सर्व स्तरांतून निषेध होत आहे.

Trending