आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाफिजवर कारवाईचा ढोंग करणाऱ्या पाकची लवकरच पोलखोल! पाकमध्ये जाऊन तपास करणार UN

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद आणि त्याच्या संघटनांवर कारवाईचा दावा करणाऱ्या पाकिस्तानची लवकरच पोलखोल होणे शक्य आहे. भारत आणि अमेरिकेच्या दबावानंतर अखेर संयुक्त राष्ट्रने आपले एक विशेष पथक पाकिस्तानात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हीच टीम पाकमध्ये जाऊन तेथील सरकारने हाफिज आणि त्याच्या संघटनांवर नेमकी काय आणि कशा प्रकारची कारवाई केली याचा तपास करणार आहे. पाकने जगाला दाखवण्यासाठी हाफिज सईदच्या संघटनांवर लावलेले निर्बंध प्रत्यक्षात किती पाळले जातात याची चौकशी सुद्धा ही समिती करणार आहे. 

 

उल्लेखनीय बाब म्हणजे, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी पाकिस्तानात हाफिजवर कुठल्याही प्रकारचा खटला नाही असे विधान केले होते. सोबतच त्याच्याविरुद्ध कारवाई करता येणार नाही असेही ते म्हणाले होते. अशात यूएनच्या विशेष पथकाचा पाकिस्तान दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे.


कोणते पथक जाणार?
- पाकिस्तानी दैनिक ‘द डॉन’ च्या एका वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे प्रतिबंध निरीक्षण पथक पाकिस्तान दौरा करणार आहे. 
- पाकिस्तान सरकारने दावा केला होता, की दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईदच्या जमात उ-दावा आणि फलाह-ए-इंसानियतला निधी गोळा करण्यास प्रतिबंध आहेत. त्यांना जाहीर सभा सुद्धा घेता येणार नाहीत. मात्र, वेळोवेळी हा दावा फौल ठरला. 
- यूएनच्या सुरक्षा परिषदेने 2008 मध्ये हाफिज सईद विरोधात ठराव मंजूर केला होता. त्यामध्ये हाफिजवर कठोर निर्बंध लावण्यात आले. 
- पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यूएनची ही टीम येत्या 25 आणि 26 जानेवारी रोजी इस्लामाबादमध्ये येणार तसेच प्रकरणांचा सखोल तपास करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...