आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुरडीवर रेप करणाऱ्या आरोपीला 4 वेळा फाशावर लटकवा, पाकिस्तान कोर्टाचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झैनब अन्सारी या 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. (फाइल) - Divya Marathi
झैनब अन्सारी या 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. (फाइल)

लाहोर -पाकिस्तानमधील पंजाबमध्ये सात वर्षांच्या मुलीची बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. ह्रदयपिळवटून टाकणाऱ्या या घटनेने संपूर्ण देशाला धक्का बसला होता. या प्रकरणात लाहोर हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. हायकोर्टाने आरोपीला चार वेळा फासावर लटकवले पाहिजे असे म्हटले आहे. अवघ्या दोन महिन्यांमध्ये कोर्टाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

 

- फाशीच्या शिक्षेसह आरोपी इमरान अली (24) याला 25 वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड हायकोर्टाने ठोठावला आहे. 

 

कुठे घडली होती घटना.. 
- पंजाबमधील कसूर शहरात घडलेल्या घटनेने संपूर्ण पाकिस्तान संतप्त झाला होता. अवघ्या सात वर्षांच्या मुलीवर शेजारी राहाणाऱ्या इमरान अलीने बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली होती. 
- मुलीचे आई-वडील सौदी अरबमध्ये राहात होते. ती कसूर येथे नातेवाईकांकडे राहात होती. 
- 5 जानेवारी 2018 रोजी मुलगी बेपत्ता झाली होती. यानंतर 9 जानेवारी रोजी शाहबाज खान रोडजवळ कचरा कुंडीत तिचा मृतदेह सापडला होता. पोस्टमॉर्टमनंतर बलात्कार झाल्याच्या घटनेला दुजोरा मिळाला होता. 

 

अँकरने मुलीला घेऊन केले होते बुलेटीन 
- सात वर्षांच्या चिमुकलीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर पाकिस्तानातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. 
- पाकिस्तानातील समा टीव्ही न्यूज चॅनलची अँकर किरन नाझ हिने स्वतःच्या मुलीला मांडीवर घेऊन बुलेटिन केले होते. आणि या घटनेने एक आई म्हणून मी अतिशय घाबरले असून दुःखी असल्याचे म्हटले होते. 
- किरन नाझच्या अँकरींची जगभरातील मीडियात चर्चा झाली होती. 

बातम्या आणखी आहेत...