Home | International | Pakistan | 50 Taliban militants killed in US rocket attack

अमेरिकेच्या रॉकेट हल्ल्यात 50 तालिबानी अतिरेकी ठार

वृत्तसंस्था | Update - May 31, 2018, 05:18 AM IST

अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांतात अमेरिकेच्या लष्कराने केलेल्या हल्ल्यात तालिबानचे किमान ५० मोठे दहशतवादी ठार झाले. अमेरि

 • 50 Taliban militants killed in US rocket attack

  काबूल - अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांतात अमेरिकेच्या लष्कराने केलेल्या हल्ल्यात तालिबानचे किमान ५० मोठे दहशतवादी ठार झाले. अमेरिकेने दहशतवाद्यांवर रॉकेटने हल्ले केले. दहशतवाद्यांची बैठक सुरू असताना हा हल्ला झाला. त्यामुळे हे सैन्याचे मोठे यश असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.


  अफगाणिस्तानातील अमेरिकी सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मार्टिन आेडोनेल यांनी बुधवारी ही माहिती दिली. आेडोनेल म्हणाले, गेल्या दहा दिवसांपासून सैन्याची व्यापक मोहीम सुरू होती. त्यात अनेक दहशतवादी ठार झाले. अफगाणिस्तानच्या अनेक भागात दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहीम एकाच वेळी सुरू करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून ही मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यादरम्यान अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळाले. निश्चितपणे अलीकडच्या काळातील ही एक चांगली मोहीम होती, असे म्हणता येईल, असे आेडॅनियल यांनी सांगितले.


  २४ मे रोजी तालिबान संघटनेने विविध विभागांतील कमांडरला बैठकीसाठी बोलावले होते. हे कमांडर एकाच ठिकाणी आल्याची खात्रीशीर माहिती होती. त्यामुळे या भागाला लक्ष्य करण्यात आले. तालिबानी दहशतवादी बैठकीतून काहीतरी कट शिजवण्यासाठी एकत्र आले होते.
  मात्र, रॉकेट हल्ल्याने तालिबानींचा कट उद्ध्वस्त झाला.

  गृह मंत्रालयाचा परिसर हादरला
  काबूलमधील संसदेच्या परिसरात असलेल्या गृह मंत्रालयाजवळ बुधवारी अनेक स्फोट व अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एक पोलिस अधिकारी मृत्युमुखी पडला. किमान दहा आत्मघाती हल्लेखोर तपास नाक्यांपासून गोळीबार करत मंत्रालय परिसरात घुसले. घटनेत पाच जण जखमी झाले. त्यानंतर उडालेल्या धुमश्चक्रीत सर्वच्या सर्व दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. सायंकाळी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले. हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे.

  तालिबानच्या हल्ल्यात ९ ठार
  लोगर प्रांतातील पूल-ए-आलममधील एका पोलिस चौकीवर तालिबानने केलेल्या हल्ल्यात किमान सहा पोलिसांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत ८ लोक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पहिल्या स्फोटात मालवाहू वाहनाला उडवून दिले. त्यानंतर आत्मघाती तीन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करत पोलिस चौकीत घुसखोरी केली. तेव्हा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत अर्धा तास धुमश्चक्री सुरू होती. दुसरीकडे कंदहार प्रांतात दहशतवाद्यांनी गॅरेजमध्ये वाहनबाॅम्बने हल्ला केला. त्यात तीन मेकॅनिकचा मृत्यू झाला, तर १० जखमी झाले.

  आर्थिक रसद तोडण्याची व्यूहरचना
  अफगाणिस्तानातील तालिबानी दहशतवाद्यांना ठार करणे एवढेच अमेरिकेने लक्ष्य ठेवलेले नाही. गेल्या वर्षी अमेरिकेने व्यूहरचनेत बदल करताना तालिबानची आर्थिक रसद थांबवण्यासाठी मोहीम हाती घेतली. त्यानुसार नोव्हेंबर २०१७ पासून अफगाणिस्तानात ११३ हवाई हल्ले करण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या सैन्याधिकाऱ्यांनी दिली.

Trending