VIDEO: एका आईने / VIDEO: एका आईने मदरशात घुसून केली मौलवीची धुलाई, हे होते कारण

VIDEO: 8 वर्षीय चिमुकलीशी अश्लील चाळे करायचा मौलवी, आईने असा शिकवला धडा.8 वर्षीय चिमुकलीशी अश्लील चाळे करायचा मौलवी, आईने असा शिकवला धडा.

दिव्य मराठी वेब टीम

Apr 22,2018 06:34:00 PM IST

इंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर सध्या एका कथित मौलवीला महिलेने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. फेसबूक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर शेअर होणारा हा व्हिडिओ पाकिस्तानचा आहे. यात मार खाणारा लहान मुला-मुलींना अरबी शिकवणारा मौलवी आहे. तर त्याला काठीने बेदम मारहाण करणारी महिला त्या मौलवीकडे शिकण्यासाठी येणाऱ्या 8 वर्षीय चिमुकलीची आई आहे.

- या व्हिडिओमध्ये एक महिला अचानक एका मदरशात काठी घेऊन शिरते आणि रागात बोलतानाच एका मौलवीची धुलाई सुरू करते. तो माणूस मार खात असतानाही काहीच विरोध करत नाही. पण, मदरशातील एका रुममध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी आतील एक शिक्षक त्याला अडवून दार बंद करतात.
- त्या महिलेची एक 8 वर्षीय मुलगी याच मदरशात शिकायला येत होती. तिने आपल्या मदरशातील एक मौलवी आपल्यासोबत अश्लील चाळे करत असल्याचे आईला सांगितले. मग, काय हातात काठी घेऊन ती आई स्वतः मदरशात घुसली.
- पाहता-पाहता लोक जमा झाले. त्यांना हे प्रकरण लक्षात आल्यानंतर त्यांनी आईला दूर केले आणि स्वतःच त्याची धुलाई सुरू केली. यानंतर त्याच्याविरोधात कोणती कारवाई झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच सोशल मीडियावर फिरणारा हा व्हिडिओ कधीचा आहे हे सुद्धा स्पष्ट होऊ शकले नाही.


पुढील स्लाइड्सवर पाहा, तो व्हिडिओ...

पाहता-पाहता लोक जमा झाले. प्रकरण लक्षात आल्यानंतर त्यांनीही या मौलवीवर हात साफ केला. पुढे पाहा, व्हिडिओ...

पाहता-पाहता लोक जमा झाले. प्रकरण लक्षात आल्यानंतर त्यांनीही या मौलवीवर हात साफ केला. पुढे पाहा, व्हिडिओ...
X
COMMENT