आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसून-हसून पोट दुखवणारी मॅच, ICC ला द्यावा लागला रडक्या Batsman चा निकाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - सोशल मीडियावर सध्या एक गल्ली क्रिकेट मॅचचा सीन तूफान व्हायरल होत आहे. या बॉलर एक चेंडू टाकतो. पण, तो बॉलही असा की टप घेऊन उचकतच नाही. बॅट्समननेही अगदी झाडूसारखी बॅट धरली आहे. बॉलकडे जाऊन बॅट्समन वाकतो आणि जमीनीला बॅट टेकवून झाडू लावल्यासारखे शॉट मारण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात अचानक मेलेल्या बॉलमध्ये जणू प्राण येतो आणि बॅट्समनला चकवा देत चेंडू थेट स्टम्पवर (विटा) धडकतो. तेवढ्यात बॅट्समन घोषित करतो 'आउट....' पण, फलंदाज पठ्ठ्या काही ऐकायला तयार नाही. देवाशप्पथ मी आऊट नाही असा आग्रह तो धरतो आणि रडीचा डाव खेळतो. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की चक्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल ICC ला त्या वादात उडी घ्यावी लागली आहे. 


ICC ने दिला हा निकाल...
हा व्हिडिओ पाकिस्तानचा आहे असे म्हटले जात आहे. एक क्रिकेट फॅन हमजाने आयसीसीला सोशल मीडियावर या रडकुंड्या बॅट्समनचा निकाल देण्याची विनंती केली. त्यावर खरोखर आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलने आपला निकाल दिला. आयसीसीने नियम 32.1 अंतगर्त बॅट्समनला बाद ठरवले. आयसीसीने सांगितल्याप्रमाणे, अतिशय दुर्दैवीपणे बॅट्समन आउट झाला आहे. सोबत आयसीसीने सुद्धा हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. 


काय आहे नियम 32.1
आयसीसीचा नियम 32.1 नुसार, हा नोबॉल नाही आणि चेंडू विकेटवर लागल्याने बॅट्समन आउट झाला आहे. त्याच्या शरीराला किंवा बॅटला बॉल लागला तरीही त्याला बाद ठरवले जाइल. या व्हिडिओमध्ये बॉल बॅटला लागून पिचवर पडला. तसेच फिरून स्टम्पवर लागला. 


पुढे आपणही पाहा, हा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...