आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIVE कार्यक्रमात गर्भवती गायिकेची गोळ्या झाडून हत्या, मर्डरचा VIDEO कॅमेऱ्यात कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या सिंध प्रांतात स्टेजवर लाइव्ह परफॉर्म करणाऱ्या गायिकेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लोक गायिका समीना समून 24 वर्षांची होती. गोळीबार करणाऱ्यांनी सुरुवातीला तिच्यावर पैशांचा पाऊस पाडला. स्टेजवर जाऊन तिला उभे राहून परफॉर्म करण्यास सांगितले. पण, ती वारंवार खाली बसून गात असल्याने तो चिडला. त्याच ठिकाणी सर्वांसमोर तिच्यावर तीन गोळ्या झाडल्या.

 

6 महिन्यांची गर्भवती होती समीना
- पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सिंध प्रांतातील एका गावात लोक कलेचा कार्यक्रम सुरू होता. त्या ठिकाणी तारीक अहमद जटोई आपल्या मित्रांसह पोहोचला होता. 
- तारीकने त्या गायिकेच्या जवळ जाऊन सुरुवातीला तिच्यावर पैसे बरसावले. यानंतर तिला उभे होऊन गाण्यास सांगितले. पण, 6 महिन्यांची गर्भवती असल्याने तिला जास्त वेळ उभे राहता येत नव्हते. 
- आपले म्हणणे ऐकलेच कसे नाही, या रागात तारीकने त्याच क्षणी समीनावर तीन फायर केले. पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, तारीक मद्यधुंद अवस्थेत होता. 
- या प्रकरणाचे वृत्त पसरताच सिंध प्रांताचे गृहमंत्री सुहैल अनवर सियाल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, लाइव्ह मर्डरचा व्हिडिओ आणि फोटो...

बातम्या आणखी आहेत...