आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानच्या विमानात घुसला भिकारी, कराची-बँकॉक फ्लाइटचा व्हिडिओ Viral

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची - रेल्वे किंवा बसमध्ये आपण नेहमीच भिकारी पाहिले असतील. पण, गोष्ट जेव्हा पाकिस्तानची असते तेव्हा काहीही होऊ शकते. पाकिस्तानात एका भिकाऱ्याने हद्दच केली. हा भिकारी चक्क विमानात घुसला आणि भीक मागायला लागला. कराची ते बँकॉक फ्लाइटचा हा व्हिडिओ एका प्रवाशाने कैद केला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सगळेच प्रवासी हैराण दिसून येतात. 


पाक म्हणे, हा आमचा नागरिक नाही...
पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की पाकिस्तानच्या नागरी उड्डयन मंत्र्यांना त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. त्यांनी हा पाकिस्तानचा नागरिकच नाही असे सांगितले आहे. पण, इतरांचे सोडा पाकिस्तानी मंत्रालयाच्या या दाव्यावर तेथील जनतेला सुद्धा विश्वास बसत नाही. एका टीव्ही चॅनलने सरकारचे म्हणणे खरे ठरवण्यासाठी तो इराणी नागरिक असल्याची बातमी प्रसिद्ध केली. पण, महत्वाचा प्रश्न जो पाकिस्तानसह जगभरातील सामान्य लोकांना सतावतो तो म्हणजे, हा भिकारी विमानात सुरक्षा भेदून घुसलाच कसा?


पुढील स्लाइडवर पाहा, या अजब घटनेचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...