आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या विमानात चक्क भिकारी पाहिलाय? आता सत्य जाणून घ्या...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात विमानामध्ये भिकारी घुसल्याचे वृत्त गेल्य काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर या घटनेचा व्हिडिओ देखील प्रसारित केला जात आहे. त्यामध्ये एक महिला अॅटेन्डंट त्या कथित भिकाऱ्याला समाजून सांगते. पण, तो काहीच ऐकूण घ्यायला तयार नाही. यानंतर विमानात बसलेले लोक त्याला आपल्या खिशातून पैसे देतानाही दिसून येतात. परंतु, या व्हायरल व्हिडिओचे सत्य आता समोर आले आहे. आणि त्यातून हे स्पष्ट होत आहे की तो भिकारी नव्हताच...


कोण होता तो?
> व्हिडिओ व्हायरल होत असताना पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी दानियाल गिलानी यांनी एक ट्वीट करून तो व्हिडिओ आणि त्यातून पसरवली जाणारी माहिती खोटी असल्याचे सांगितले. दानियाल पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाचे माजी चेअरमन आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे माजी प्रेस सचिव होते. 
> त्यांनी सांगितल्याप्रमाणे, या व्हिडिओमध्ये ज्या व्यक्तीला पाकिस्तानी म्हटले जात आहे तो प्रत्यक्षात एक इराणी नागरिक आहे. त्याने विमानात सुरक्षा भेदून घुसत उड्डानाला विलंब लावला हे वृत्त सुद्धा खोटे आहे. दोहा ते शिराझ या विमानात तो अचानक नाही आला. तर त्याला तेथे बसवण्यात आले होते. 
> हा माणूस प्रत्यक्षात एक अनाधिकृत इराणी शरणार्थी होता. तो फारसी भाषा बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येते. व्हिडिओ तयार करणारी व्यक्ती सुद्धा फारसी बोलत होती. त्या माणसाला अनाधिकृतरित्या प्रवेश केल्याने डीपोर्ट करण्यात आले. त्यावेळी त्याच्या हातात काही सामान तर सोडाच खिशात एक पैसाही नव्हता. 
> त्याने विमानात रड गाऱ्हाणे करत आपली परिस्थिती सर्वांना सांगितली आणि प्रवाशांना मदतीचे आवाहन केले. यानंतरच प्रवाश्यांनी त्याची मदत केली. तो भीक मागत होता, किंवा लोक त्याला भीक देत होते असे मुळीच नाही. 


पुढील स्लाइडवर पाहा, तो व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...