आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - बलुचिस्तान पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या प्रांतांपैकी एक आहे. तरीही दहशतवादी हल्ले आणि पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचारांमुळे नेहमीच चर्चेत राहतो. नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न असला तरीही या राज्यातील जनता अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून स्थानिक नेते आणि पाक सरकारमध्ये मतभेद सुरू आहेत. स्थानिकांवर बंडखोरांना आश्रय दिल्याच्या आरोपांखाली सैनिक अत्याचार करतात. त्याचाच फटका म्हणून येथील स्थानिक दारिद्री आणि बेरोजगारीला सामोरे जात आहेत.
- बलुचिस्तानमध्ये लोक सरकारविरोधात उठत आहेत. स्थानिक नेते प्रत्येक आंदोलनात स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. मात्र, पाक सरकार लष्कराचा वापर करून त्यांचा आवाज दाबत आहे.
- पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचारांमुळे येथे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि लश्कर-ए बलूचिस्तानसारख्या फुटिरतावादी संघटना तयार झाल्या आहेत.
- पाक सैनिकांकडून होणाऱ्या हिंसाचार, मर्डर आणि बलात्कारांसह अमानवीय यातनांच्या विरोधात स्थानिक नेते परदेशातही जाऊन आपला आवाज बुलंद करत आहेत.
- बलुच नेते नायला कादरी यांनी सांगितल्याप्रमाणे, पाकिस्तान सरकार स्थानिकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्या रासायनिक शस्त्रांचा वापर करत आहे. अगदी लहान मुलांना सुद्धा ठार मारले जात आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पाकिस्तानी लष्कराने असे केले बलुचिस्तानच्या स्थानिकांचे हाल...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.