आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्स्ट नाइटचा VIDEO करून वधूला ब्लॅकमेल करणारी टोळी, पाकिस्तानात भांडाफोड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडिओ करून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पाकिस्तानात भांडाफोड झाला आहे. ही टोळी पाकिस्तानातील गरीब मुलींशी विवाह करून त्यांच्या खासगी क्षणांचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. पीडित तरुणींनी पत्रकार परिषद घेऊन हा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ब्रिटनमध्ये राहणारे पाकिस्तानी पुरुष लग्नासाठी पाकिस्तानी मुलींना अडकवत होते. त्यांनी कित्येक पाकिस्तानी मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. 


- पत्रकार परिषदेत आलेल्या बहुतांश पीडित तरुणी पाकिस्तानच्या मीरपूर शहरातून होत्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ब्रिटिश पाकिस्तानी युवक त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या आयुष्याचे स्वप्न दाखवत यानंतर त्या मुलींशी लग्न करत होते. 
- गरीब कुटुंबीय युकेतून आलेल्या या पाकिस्तानींच्या भूलथापांना सहज बळी पडत होते. ते आपल्या मुलींचे विवाह अशा पुरुषांसोबत अगदी आनंदाने करतात. अशा प्रकारचे रॅकेट चालवणाऱ्या ब्रिटिश-पाकिस्तानी पुरुषांची एक मोठी टोळी आहे. मुमताज त्यांचा म्होरक्या आहे. 

- मुमताज उर्फ ताजा पैलवान पाकिस्तानी तरुणींना चांगले स्वप्न दाखवून त्यांच्याशी विवाह करतो. त्यांना परदेशात नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करतो. तसेच लग्नाच्या फर्स्ट नाइटचा व्हिडिओ तयार करतो. त्याच्या टोळीतील प्रत्येक सदस्य असे करत आला आहे. 
- यापैकी काही सदस्य लग्नानंतर आपल्या पत्नीला कधीच परदेशात घेऊन जात नाहीत. त्यांच्यासोबत अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करतात. इतर महिलांसोबतही लग्न करून त्यांचेही व्हिडिओ तयार करतात आणि वेळोवेळी ते जाहीर करण्याची धमकी देतात. याच धमक्या देऊन ते महिलांना तलाक सुद्धा घेऊ देत नाहीत.
- या टोळीचा म्होरक्या मुमताजने आतापर्यंत 7 मुलींशी विवाह केल्याची नोंद आहे. इतर सदस्यांनी सुद्धा एकापेक्षा अधिक विवाह करून ही टोळी चालवली. ही टोळी इंटरनेटवर असे व्हिडिओ अपलोड करून काळी कमाई करत असल्याचा आरोप सुद्धा होत आहे.


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...