Home | International | Pakistan | Common Misconception About Pakistan Around The World And Facts

PAK मध्ये सगळ्याच महिला वापरत नाहीत बुरखा, दूर करा या देशाबद्दलचे गैरसमज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 29, 2018, 12:15 AM IST

पाकिस्तानचे शहरी आयुष्य खूप वेगळे आहे. शिक्षण आणि उद्योगाच्या बाबतीत सुद्धा पाकिस्तानने स्वतःला विकसित केले आहे.

 • Common Misconception About Pakistan Around The World And Facts

  इंटरनॅशनल डेस्क - भारत आणि पाकिस्तानध्ये क्रिकेट सामनाही झाल्यास दोन्ही देशांमध्ये खळबळ उडते. दोन्ही देशांचे फॅन्स एकमेकांवर बरसतात. भारतीयांच्या डोक्यात पाकिस्तानबद्दल अनेक गैरमसजूती आहेत. पाकिस्तानात नुसते दहशतवादी हल्लेच होतात, पाकिस्तान एक निरक्षर देश आहे असे नानाविध प्रकारचे गैरसमज भारतीयांच्या डोक्यात आहेत. प्रत्यक्षात मात्र, पाकिस्तानचे शहरी आयुष्य खूप वेगळे आहे. शिक्षण आणि उद्योगाच्या बाबतीत सुद्धा पाकिस्तानने स्वतःला विकसित केले आहे.


  पाकिस्तान म्हटले, की अतिशय बारीक गल्ली बोळ्यांची शहरे आणि हातात बंदुका घेऊन फिरणारे दहशतवादी, कुर्ता पायजामामध्ये हातगाडे घेऊन फिरणारे लोक असेच चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पाकिस्तान अतिशय मागासलेला देश म्हणून कुप्रसिद्ध आहे. तरीही, गेल्या काही वर्षांत पाकिस्तानने पायाभूत विकास केला आहे. कराची, लाहोर आणि इस्लामाबादसारख्या शहरांमध्ये गगनभेदी इमारती उभ्या आहेत. दररोज पाकिस्तानात विकासाचे आराखडे सादर केले जात आहेत. पूर्वीसारखा पाकिस्तान निरक्षर राहिलेला नाही.


  पुढील स्लाइड्सवर पाहा, पाकिस्तानबद्दल भारतीयांचे आणखी काही गैरसमज...

 • Common Misconception About Pakistan Around The World And Facts

  निरक्षर पाकिस्तान
  पाकिस्तान एक अत्यंत निरक्षर राष्ट्र असल्याचे बहुतांश भारतीयांना वाटते. प्रत्यक्ष आकडेवारी पाहिल्यास आपल्याला धक्काच बसेल. पाकिस्तानात साक्षरतेचे प्रमाण 65 टक्के आहे. त्यामुळे, पाकिस्तानला निरक्षर म्हणता येणार नाही. 

 • Common Misconception About Pakistan Around The World And Facts

  दळवळणासाठी वापरतात, उंट आणि खेचर
  चित्रपटांमध्ये पाकिस्तानचे व्यापारी दळण-वळणासाठी उंट आणि खेचरांचा वापर करत असल्याचे दिसून येते. अनेक चित्रपटांमध्ये पाकिस्तानात 1950 चे जुनाट ट्रक आजही वापरत असल्याचे दाखवले जाते. प्रत्यक्षात, पाकिस्तानात उंट आणि खेचरांचा वापर खूप कमी प्रमाणात केला. अत्याधुनिक ट्रक आणि मालवाहू वाहनांमध्ये वस्तूंची ने-आण केली जाते. 

 • Common Misconception About Pakistan Around The World And Facts

  पाकिस्तानात महिलांवर केवळ अत्याचारच
  पाकिस्तानात महिलांची अवस्था खूप काही चांगली असल्याचे म्हणता येणार नाही. मात्र, त्या देशात नेहमीच महिलांवर केवळ अत्याचार केले जातात. त्यांना बंद खोल्यांमध्ये किंवा बुर्ख्यांमध्ये ठेवले जाते हे सत्य नाही. पाकिस्तानातील महिला विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.

 • Common Misconception About Pakistan Around The World And Facts

  पाकिस्तान मध्यपूर्वेत
  पाकिस्तान एक मिडल ईस्ट राष्ट्र असल्याचा काहींना गैरसमज आहे. पण, तो दक्षिण आशियातील भारतीय उपखंडाचा देश आहे.

 • Common Misconception About Pakistan Around The World And Facts

  बोरिंग लाइफ जगतात पाकिस्तानी
  पाकिस्तानचे सगळेच नागरिक अतिशय बोरिंग लाइफ जगतात हा गैरसमज आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा पब आणि डिस्को आहेत. ज्या ठिकाणी नेहमीच तरुण आणि तरुणींची गर्दी असते. दिलखुलास पार्टी करून ते बिंधास्त आयुष्य देखील जगतात.

 • Common Misconception About Pakistan Around The World And Facts

  पाकिस्तानी म्हणजेच दहशतवादी
  पाकिस्तान हा देश दहशतवादी हल्ले, दहशतवादी शिबीरे आणि धमक्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. पाकिस्तान दहशतवादाची फॅक्ट्री आहेत यातही काहीच वाद नाही. पण, प्रत्येक पाकिस्तानी नागरिक दहशतवादी असतो, किंवा पाकिस्तानी म्हणजे दहशतवादी म्हणणे योग्य नाही. पाकिस्तानातील बहुसंख्य नागरिक शांततेने आपले आयुष्य जगत आहेत. त्या लोकांना काही कट्टर नेत्यांच्या भाषणांचा आणि दहशतवादी कृत्यांमुळे होणारे नुकसान सहन करावे लागत आहे. 

 • Common Misconception About Pakistan Around The World And Facts

  पाकिस्तानी पुरुष केवळ पगडी, कुडता घालतात
  पाकिस्तानी पुरुष म्हटले की डोळ्यासमोर पगडी किंवा कुडता पायजामा घातलेला माणूस उभा होतो. पण, याच पाकिस्तानात अभिनेता फवाद खान सारखे आधुनिक आणि हॅन्डसम पुरुष देखील आहेत. तेथे सुद्धा नव-नवीन फॅशन ट्रेंड करतात. 

 • Common Misconception About Pakistan Around The World And Facts

  सगळ्याच महिला घालातात बुर्खा
  पाकिस्तानात बहुसंख्य महिला बुर्खा किंवा नकाब घालतात. पण, प्रत्येक पाकिस्तानी महिला बुर्खा घालूनच वावरते असे नाही. पाकिस्तानात महिला जीन्स, टॉप आणि टीशर्ट सुद्धा घालतात. 

 • Common Misconception About Pakistan Around The World And Facts

  अरबी बोलतात पाकिस्तानी
  पाकिस्तानी अरबी भाषा बोलतात आणि त्यांची प्रमुख भाषा हीच असल्याचा बहुतांश भारतीयांना गैरसमज आहे. प्रत्यक्षात पाकिस्तानची राष्ट्रीय भाषा उर्दू आहे. आणि हे ऐकूण धक्का बसेल की पाकिस्तानची 49 टक्के जनता इंग्रजी बोलते.

Trending