आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये आठ वर्षांच्या मुलीचा अत्याचारानंतर खून; निदर्शकांची पोलिसांशी चकमक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कसूर जिल्ह्यात आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून नंतर तिचा खून करण्यात आला. या प्रकरणात बुधवारी नागरिकांनी निदर्शने केली. निदर्शक आणि पोलिस यांच्यात झालेल्या चकमकीत दोन जणांचा मृत्यू झाला.


एक आठवड्यापूर्वी आरोपी या मुलीला घेऊन गेला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलीला घेऊन जाताना दिसला आहे. या मुलीचा मृतदेह मंगळवारी रात्री कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ आढळला. अत्याचार केल्यानंतर मुलीचा गळा दाबून खून करण्याात आल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. मुलीचे आई-वडील उमरा करण्यासाठी सौदी अरेबियाला गेले आहेत. ही मुलगी आपल्या परिचितांच्या घरी राहत होती. लाहोर उच्च न्यायालयाने या प्रकरणी अहवाल मागवला आहे. दुसरीकडे आरोपींना अटक करण्याकडे पोलिस दुर्लक्ष करत आहे असे वृत्त सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर नागरिक बुधवारी कसुरी येथे जमा झाले. त्यांनी पोलिस ठाण्यावर दगडफेक सुरू केली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. 

बातम्या आणखी आहेत...