आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पाकच्या कोळसा खाण कामगारांचे दैनंदिन आयुष्य, रोज होतो जगण्याचा संघर्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात दोन खाणींमध्ये झालेल्या स्फोट आणि दरडकोसळीच्या घटनेत किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी आकडा 18 असला तरीही 27 जणांचा यात बळी गेल्याचे सांगितले जात आहेत. पाकिस्तानात खाणकामगारांचे आयुष्य नरकयातनांपेक्षा कमी नाही. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस जणू जगण्यासाठीचा संघर्ष असतो. खाणकाम करण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचे तंत्रज्ञान नाही. हातांनी वापरल्या जाणाऱ्या फावडा, कुडाळ आणि कुऱ्हाडांचा ते वापर करतात. त्यातून मिळणारी कमाई सुद्धा इतकी कमी की दोन वेळचे जेवण सुद्धा शक्य होणार नाही. 


पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सर्वाधिक कोळसा खाणी आहेत. देशातील सर्वात धनाढ्य आणि नैसर्गिक साधन संपत्तीने भरलेल्या या राज्यात खाणकामगार मिळत नाहीत. अशात स्वात आणि खैबर अशा दुरस्थ भागांतून पोट भरण्यासाठी मजूर येतात. त्यांना स्थानिक कंत्राटदार रोजंदारीवर कामाला घेतात. मजुरांच्या एका समूहाला दिवसभरात एक टन कोळसा काढावा लागतो. यासाठी त्यांना 650 रुपये रोज दिले जातात. त्यातून कामगार आपल्या गटात मजुरीची विभागणी करून घेतात. जेवणानंतर काहीच उरत नाही. घरी जाणे आणि परत कामाला येण्यासाठी पैसे नसल्याने कित्येक मजुरांनी याच खाणींच्या जवळपास आपले तंबू ठोकले आहेत. यापैकी काहींचे वय 14 वर्षे किंवा त्याहूनही कमी आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...