Home | International | Pakistan | Examiner Molested 80 Girl Students In Biology Practicals, Reveals FB Testimony

प्रॅक्टिकलच्या नावे 80 विद्यार्थिनींना अश्लील Touch; एकीने फेसबूकवर लिहिले

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 03, 2018, 11:17 AM IST

पाकिस्तानच्या विद्यार्थिनींनी प्रॅक्टिकलसाठी आलेल्या शिक्षकाने आपल्याला अश्लील टच केल्याचे आरोप लावले आहेत.

 • Examiner Molested 80 Girl Students In Biology Practicals, Reveals FB Testimony

  इस्लामाबाद - पाकिस्तानच्या विद्यार्थिनींनी प्रॅक्टिकलसाठी आलेल्या शिक्षकाने आपल्याला अश्लील टच केल्याचे आरोप लावले आहेत. बाहरिया महिविद्यालयात 12 वी सायन्सच्या विद्यार्थिनींचे बायोलॉजीचे प्रात्यक्षिक सुरू होते. त्याचवेळी बाहेरून आलेल्या परीक्षार्थीने हे टाळके फिरवणारे कृत्य केले आहे. त्यापैकी एकीने सांगितल्याप्रमाणे, परीक्षार्थी जेव्हा तिला मागून हात लावत होता त्यावेळी महाविद्यालयातील शिक्षिका त्याच ठिकाणी बसून पाहत होती. तरीही तिने काहीच केले नाही. उलट तिला शांत राहण्यास सांगितले.


  3 दिवसांच्या प्रॅक्टिकलसाठी आला होता...
  - पाकिस्तानच्या बाहरिया कॉलेजमध्ये 12 वीच्या वार्षिक परीक्षा नुकत्याच पार पडल्या. तसेच 24, 26 आणि 27 मे रोजी तीन दिवस प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट सादरीकरण सुरू होते. यासाठी पाकिस्तानच्या केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सादत बशीर नावाच्या परीक्षकाची निवड केली होती.
  - सादत बशीरने प्रॅक्टिकलच्या पहिल्या दिवशीच 24 मे रोजी आपले चाळे सुरू केले. त्यावेळी सर्वप्रथम ज्या विद्यार्थिनीचे शोषण झाले तिनेच फेसबूक पोस्टमध्ये आपली धक्कादायक आपबिती मांडली आहे.


  विद्यार्थिनीने सांगितली आपबिती...
  - विद्यार्थिनीने सांगितल्याप्रमाणे, "बशीर सादत आमच्या लॅबमध्ये बसला होता आणि सगळ्याच विद्यार्थिनी प्रॅक्टिकल सबमिशनसाठी जमा झाल्या होत्या. मी फर्स्ट बॅचची विद्यार्थिनी होते. तसेच सर्वात आधी प्रॅक्टिकल सादर करण्यासाठी सकाळी 8 वाजताच लॅबमध्ये आले होते."
  - "त्याने जे काही केले ते सांगतानाही मला किळस येते. सर्वप्रथम मी बायोलॉजीचे प्रॅक्टिकल सादर करण्यासाठी गेले. आपले प्रोजेक्ट डेस्कवर अॅडजस्ट करत होते. वाकले तेवढ्यात त्याने माझ्या पार्श्वभागाला हात लावला. मी अचानक फ्रीझ झाले, काय करावे काहीच कळत नव्हते. त्याच्या शेजीरीच आमच्या शिक्षिका बसल्या होत्या. त्या हे सर्व काही पाहत होत्या. मी त्यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने पाहिले. तेव्हा त्यांनी नजरा दुसरीकडे फिरवल्या व दुर्लक्ष केले."
  - "परीक्षार्थीविरोधात काहीही बोलल्यास तुझे मार्क त्याच्या हातात आहेत असा इशारा देत टीचरने मला शांत राहण्यास सांगितले. यानंतर मी कसेबसे सावरले आणि प्रॅक्टिकलच्या स्लाइड्स दाखवत होते तेव्हा तो स्लाइड नव्हे, तर माझ्या कुडत्याच्या आत पाहण्याचा प्रयत्न करत होता. त्याची नजर माझ्या ब्रावर होती."
  - "यानंतर मी तिला बेडकाचा प्रयोग सादर केला. प्रात्यक्षिक दाखवत होते, तेव्हा मला त्याने विचारले, की हा बेडूक मेल आहे की फीमेल? मी मेल म्हणाले. तेव्हा तो नराधम म्हणतो, हे बघ या बेडकाला ओव्हरी आहे. आतमध्ये तुलाही असतील ना?"
  - "माझ्याप्रमाणेच त्याने इतर 80 विद्यार्थिनींचे असेच शोषण केले. त्या सर्वांना मार्क कमी करण्याची धमकी दिली होती. मी सुद्धा घाबरले होते आणि शांत राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, माझ्या मैत्रिणींनी प्रोत्साहित केल्याने मी हे सर्व लिहू शकले. पुन्हा असे कुणासोबतही घडू नये आणि त्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी या अपेक्षेने मी हे लिहिते आहे."


  ती टीचर म्हणाली...
  वर्गात असतानाही शिक्षिकेने कुणालाही वाचवले नाही. उलट मार्क त्या नराधमाच्या हातात असल्याच्या धमक्या देत सर्वांना शांत राहण्यास सांगितले. आता मात्र, तिची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली. महाविद्यालय प्रशासनाला त्या परीक्षार्थीवर संशय होता. त्यामुळेच, खबरदारीसाठी त्या शिक्षिकेला प्रॅक्टिकलसाठी प्रयोगशाळेत बसवण्यात आले होते. प्रॅक्टिकल सुरू असताना सुद्धा तो शिक्षिकेला बाहेर जाण्यास सांगत होता. जेणेकरून विद्यार्थिनी एकट्याकत त्याला भेटतील. पण, आपण प्रयोगशाळेबाहेर गेले नाही असा दावा शिक्षिका करत आहे. काही विद्यार्थिनींनी सुद्धा तिचा दावा खरा असल्याचे सांगितले आहे.


  प्राचार्य काय म्हणाले?
  प्राचार्य इकबाल जावीद यांनी वाद वाढत असल्याचे पाहता माध्यमांना प्रतिक्रिया दिली तसेच पाकिस्तानच्या केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सादत बशीर नावाच्या परीक्षका तक्रार केली. त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वस्त केले. परंतु, या कारवाईवर विद्यार्थिनी समाधानी नाहीत.

 • Examiner Molested 80 Girl Students In Biology Practicals, Reveals FB Testimony
 • Examiner Molested 80 Girl Students In Biology Practicals, Reveals FB Testimony

Trending