आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आध्यात्मिक गुरू बुशरांशी इम्रान खानचा निकाह; तिसऱ्या निकाहनंतर पंतप्रधानपदाचा योग : बुशरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी ट्वीट करून इम्रान यांच्या विवाहास अधिकृत दुजोरा दिला. - Divya Marathi
पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी ट्वीट करून इम्रान यांच्या विवाहास अधिकृत दुजोरा दिला.

लाहोर- माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानच्या तेहरीक- ए- इन्साफ पार्टीचे प्रमुख इम्रान खान यांनी रविवारी बुशरा मानेका यांच्याशी तिसरा निकाह केला. बुशरा या त्यांच्या अाध्यात्मिक गुरू आहेत. पिंकी पीर नावाने त्या प्रसिद्ध आहेत. तिसरा विवाह केल्यानंतरच इम्रान यांना  पंतप्रधानपदाचा योग आहे, असे भविष्य बुशरा यांनी वर्तवले होते. यापूर्वी इम्रान यांनी ब्रिटिश वंशाच्या जेमिमा गोल्डस्मिथ आणि रेहम खानशी निकाह केले होते.  


पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे  (पीटीआय) प्रवक्ते फवाद चौधरी यांनी ट्विट करून निकाहाच्या बातमीला दुजोरा दिला. बुशरा यांच्या भावाच्या घरी निकाह झाल्याचे त्यांनी सांगितले. 


निकाहविषयी निर्णय घेण्याची घाई

इम्रान खान यांना सल्ला दिला होता की, लवकर विवाहाचा निर्णय जाहीर करावा. अन्यथा निवडणुकीच्या निकालांवर याचा परिणाम होईल.  बुशरा यांना आपल्या पहिल्या पतीपासून ५ अपत्ये आहेत. अाध्यात्मिक सल्ला देणाऱ्या बुशराकडे त्यांचे वर्षभरापासून येणेजाणे आहे. पक्षाविषयी बुशराने केलेले पूर्वानुमान खरे सिद्ध झाले. त्यानंतर दोघांमध्ये निकटता वाढली. त्यानंतर बुशराने तिच्या पतीपासून फारकत घेतली. गेल्या महिन्यात विवाह प्रस्ताव ठेवल्याचे इम्रानने मान्य केले, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.


पूर्वी दोन वेळा केला विवाह  
यापूर्वी इम्रान यांचे दोन विवाह झाले होते. १९९५ मध्ये इम्रानने ब्रिटिश अब्जाधीशाची कन्या जेमिमाशी विवाह केला होता. हे नाते ९ वर्षे टिकले. जेमिमाला इम्रानपासून २ मुले आहेत. २००४ मध्ये त्यांचा तलाक झाला. २०१५ मध्ये इम्रानने दुसरा विवाह टीव्ही अँकर रेहम खानशी केला. १० महिन्यांतच त्यांचा तलाक झाला.  

 

यापूर्वी केले दोन विवाह
- इम्रान खान यांनी यापूर्वी 1995 मध्ये ब्रिटिश अब्जाधीशाची कन्या जेमिमा हिच्याशी विवाह केला. जेमिमाकडून इम्रान यांना दोन अपत्ये आहेत. 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 
- 2015 मध्ये इम्रान यांनी दुसऱ्यांदा विवाह केला. ते ब्रिटिश टीव्ही अँकर रेहाम खानच्या प्रेमात पडले होते. वर्षभराच्या आत त्यांच्यात तलाक झाला. 

बातम्या आणखी आहेत...