आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी अॅक्ट्रेस सुंबुलचा खून, धनाढ्यांच्या पार्टीत नाचण्यास केला होता नकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानची प्रसिद्ध अॅक्ट्रेस सुंबुल खानचा तिच्या घरातच घुसून खून करण्यात आला आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, तीन लोकांना तिला ठार मारले. पाकची धनाढ्य मंडळी तिला आपल्या खासगी पार्टीमध्ये नाचण्यासाठी घेऊन जाणार होते. पण, तिने नकार दिल्याने लोक बळजबरी तिच्या घरात घुसले आणि तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. सुंबुलने विरोध केला, तेव्हा तिघांनी तिच्यावर 11 गोळ्या झाडल्या. यात घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.


आरोपींमध्ये पोलिस अधिकाऱ्याचेही नाव
- आरोपींपैकी एकाचे नाव नईम खटक आहे. तो एक माजी पोलिस अधिकारी आहे. त्याला रविवारीच अटक करण्यात आली. इतर दोन आरोपी सध्या फरार आहेत. 
- 25 वर्षीय सुंबुल पश्तो भाषा चित्रपटांमध्ये अॅक्टर आणि सिंगर होती. या व्यतिरिक्त ती अनेक टीव्ही शोजमध्ये सुद्धा दिसून आली.
- गतवर्षी आणखी एक युवा अॅक्ट्रेस किस्मत बेग हिचा देखील लाहोरमध्ये खून करण्यात आला होता. किस्मत एका नाटकात परफॉर्म करून घरी परतत होती. तिच्या अपहरणाचा प्रयत्न करताना हल्लेखोरांनी तिच्यावर 3 गोळ्या झाडल्या होत्या. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...