आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात हिंदूंचे होली सेलिब्रेशन, अशी झाली रंगांची उधळण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - भारतासह जगभरात होळीचे सेलिब्रेशन होत असतानाही पाकिस्तानातही रंगांची उधळण झाली. येथील हिंदू समुदायांनी विविध कार्यक्रम आयोजित करून एकमेकांना रंग लावले. यासोबतच पाकिस्तानच्या आंतरधर्मीय सलोखा मंत्रालयाने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या मरिअम शरीफ आणि पीटीआय पक्षाचे नेते इम्रान खान यांनीही देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हिंदू समुदाय सर्वाधिक आहे. या ठिकाणी सुद्धा विविध समुदायांकडून होळीचा सण साजरा करण्यात आला आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पाकिस्तानात होळी सेलिब्रेशनचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...