Home | International | Pakistan | Imran Khan And His Powerful Car Toyota land cruiser Prado

Car नसल्याचा दावा करतात इम्रान खान, कलेक्शनमध्ये अशी गाडी अपघातानंतर लागणार नाही धक्का

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 26, 2018, 12:57 PM IST

इम्रान यांनी निवडणुकीच्या कागदपत्रांमध्ये कारचा उल्लेख केला नाही. तो रकाना रिकामाच ठेवला आहे.

 • Imran Khan And His Powerful Car Toyota land cruiser Prado

  इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याच्या मार्गावर असलेले इम्रान खान आपल्या मालकीची एकही कार नाही असे दावा करतात. त्यांनी निवडणुकीच्या कागदपत्रांमध्ये कारचा उल्लेख केला नाही. तो रकाना रिकामाच ठेवला आहे. प्रत्यक्षात मात्र, त्यांच्याकडे कारचे अख्खे कलेक्शन आहे. कार चालवण्याचे शौकीन असलेले इम्रान खान यांच्या ताफ्यात अशीही एक कार आहे जिच्या सध्या चर्चा आहेत. ही कार टोयोटा लॅन्ड क्रूझर प्राडो अशी आहे. पीटीआय प्रमुख खान यांची आवडती कार असलेली प्राडो जितकी शक्तीशाली आहे, तितकीच मजबूत सुद्धा आहे. अपघात झाल्यास कार आणि आत बसलेल्यांना धक्काही लागणार नाही हे या कारचे वैशिष्ट्य आहे.


  अशी आहे खान यांची आवडती कार...
  - शक्तीशाली इंजिन आणि मजबूतीच्या बाबतीत टोयोटा लॅन्ड क्रूझर प्राडोला तोड नाही. जितकी पॉवरफुल तितकीच सुरक्षित आणि मजबूत हे या कारचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या कारमध्ये 2.7 लीटर पेट्रोल, 2.8 लीटर डीझल आणि 4.0 लीटर डीझेल इंजिनची यंत्रणा आहे. या कारमध्ये 5 स्पीड आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअर ट्रान्समिशनचे पर्याय देण्यात आले आहेत.
  - फीचर्सबद्दल बोलावयाचे झाल्यास यात अँग्युलर फॉग लॅम्प, मल्टीपल एलॉय व्हील, एलईडी स्टॉप लाइट, इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि सेंटर कंसोल फीचर देण्यात आले आहे. 8 इंची इंफोटेनमेंट ब्लुटूथ स्क्रीन, 4 इंच इंफॉर्मेशन एलईडी, ऑटो क्लायमेट कंट्रोल, टोयोटा सेफ्टी सेन्स, टायर प्रेशर वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर आणि रिअर क्रॉस ट्रॅफिक अॅलर्ट अशा सुविधा आहेत.
  - त्यातही या कारचे सर्वात महत्वाचे फीचर याची सेफ्टी आहे. कारची बॉडी आणि सेन्सर यंत्रणा अशी करण्यात आली आहे, की अपघात झाल्यास कारच्या बॉडीला फक्त काही स्क्रॅच येतील. तसेच गंभीर स्वरुपाच्या अपघातानंतरही आत बसलेल्या व्यक्तीला फारसे नुकसान होणार नाही. अपघाताच्या वेळी कारचे सेन्सर अॅक्टिव्ह होऊन वाचण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. या कारचे डिझाईन अपघाताचा शॉक सुद्धा सहन करण्यासाठी समर्थ आहे. याची किंमत 94 लाखांपासून सुरू होते.

Trending