आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमरान खान समलैंगिक! महिलांशी सेक्स चॅटचा खुलासा; रेहामच्या पुस्तकावर बंदीची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान होऊ पाहणारे माजी क्रिकेटर आणि राजकारणी इमरान खान समलैंगिक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एवढेच नव्हे, तर ते आपल्या सहकारी महिला नेत्यांसोबत सेक्स चॅट करतात अशाही चर्चा आहेत. या सर्व चर्चांना कथितरीत्या त्यांच्या माजी पत्नी रेहाम खान यांचे आगामी पुस्तक जबाबदार आहे. मार्केटमध्ये लॉन्च होण्यापूर्वीच रेहाम यांचे पुस्तक लीक झाले. त्यामध्येच हे सर्व आरोप करण्यात आले आहेत. यानंतर पाकिस्तान तहरीक-ए इंसाफचे चीफ इमरान खान यांच्यासह अनेकांनी पुस्तकावर बंदीसाठी कोर्टात धाव घेतली आहे. 


कोण आहे रेहाम खान..?
रेहाम खान इमरान खान यांची माजी पत्नी आहे. तत्पूर्वी ती बीबीसीची पाकिस्तानातील प्रतिनिधी आणि पत्रकार होती. या दोघांचा विवाह फक्त 10 महिनेच टिकला. यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. इमरान खान यांच्यासोबत असताना ते नेहमीच आपल्याला कमी लेखत होते. कुठल्याही महिलेला नियंत्रण आणि दबावाखाली ठेवणे हा इमरानचा स्वभाव असल्याचे सुद्धा तिने म्हटले होते. तिनेच आता एक पुस्तक लिहिले असून त्याची प्रस्तावना लीक झाली असे सांगितले जात आहे. 


कुठून लीक झाली माहिती?
> पाकिस्तानी स्टेज अॅक्टर हमझा अली अब्बासीने सर्वप्रथम आपल्या ट्विटर अकाउंटवरून आपण रिलीज नाही झालेल्या पुस्तकाची प्रस्तावना वाचल्याचा दावा केला. त्यानुसार, इमरान खान जगातील सर्वात वाइट राजकारणी आहे. तर, रेहाम खान या पृथ्वी तलावरील सर्वात पवित्र महिला आहे. सोबत शहबाज शरीफ यांच्यापेक्षा चांगला माणूस दुसरा कुणीच नाही. 
> रेहामने पीएमएल-नवाज या पक्षाकडून 89 लाख रुपये घेतले आहेत. त्याच पैश्यांच्या व्यवहारानंतर तिने हे पुस्तक लिहिले. पाकिस्तानच्या संसदीय निवडणुकीत ती पीएमएलएनचा प्रचार करण्यासाठी आणि इमरान खान यांची प्रतिमा मलीन करण्यासाठीच हे पुस्तक आहे. असाही आरोप त्याने लावला.
> यानंतर माध्यमांनी हमझाला यासंदर्भातील पुराव्यांची विचारणा केली. तेव्हा आपण हे सर्व काही ऐकूण बोलत आहोत. तसेच पीएमएल-एन एक शहाणा पक्ष असून ते पैश्यांचा व्यवहार अधिकृतरीत्या करणार नाही. त्यामुळे, पैश्यांची गोष्ट सिद्ध करता येणार नाही असे त्याने म्हटले आहे. हमझा अली अब्बासी स्वतःला अॅक्टर आणि राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रत्येक विषयावर आपले एक्सपर्ट कॉमेंट देण्यासाठी पाकिस्तानात कुप्रसिद्ध आहे.


रेहाम खान म्हणे...
रेहाम खानने आता हमझा अली अब्बासी विरोधात खटला दाखल केला आहे. त्यामध्ये आपण कुठेही पुस्तकाची मॅन्युस्क्रिप्ट जाहीर केलेली नाही. त्यामुळे, अब्बासीने केलेला दावा हा सर्रास खोटा आहे. हे कॉपिराइट चोरीचे प्रकरण आहे. सोबतच, गेल्या काही दिवसांपासून मला हमझा अब्बासीकडून सतत धमक्या मिळत आहेत. त्याचे काही स्क्रीनशॉट सुद्धा रेहामने सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि एक लीगल नोटीस सुद्धा पाठवली. परंतु, आपल्या पुस्तकात इमरान खान यांच्यासंदर्भात ते दावे करण्यात आले नाहीत असेही रेहामने स्पष्ट केले नाही.


जुलैमध्ये संसदीय निवडणूक
31 मे 2018 रोजी पाकिस्तान सरकारचा कार्यकाळ संपला आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी शाहिद खाकान अब्बासी पंतप्रधान झाले आहेत. निवडणुकीसाठी आता 25 जुलैची तारीख निश्चित करण्यात आली आहे. याच दिवशी मतदान होणार आहे. यात इमरान खान स्वतःला भावी पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करत आहेत. अशात त्यांच्या संदर्भातील धक्कादायक आरोप आणि खुलासे त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात टाकू शकतात. 

 

वकार युनूस यांचेही नाव...
इमरान खान यांच्यासह त्यांच्या पक्षातील अनेकांनी या पुस्तकावर बंदीची मागणी केली. कोर्टात विविध प्रकारच्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्या याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानचे माजी क्रिकेटर आणि इमरान खान यांचे मित्र वकार युनूस यांचाही समावेश आहे. पुस्तकात कथितरीत्या आपले नाव आल्याने त्यांनी यावर बंदीची मागणी केली. यासह रेहामवर मानहानीचे खटले सुद्धा दाखल करण्याची तयारी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...