आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमरान खानने 60 च्या वयात केला होता हिच्याशी निकाह, इंटरव्यूतच झाले फिदा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानचे माजी क्रिकेटर आणि राजकीय नेते इमारान खान सध्या तिसऱ्या लग्नाच्या वृत्तामुळे चर्चेत आहेत. माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी आध्यात्मिक गुरू बुशरा मनेका यांच्याशी तिसऱ्यांदा निकाह केला. मात्र, इमरान खान यांचा राजकीय पक्ष पाकिस्तान तहरीक-ए इंसाफने आणि नुकतेच घटस्फोट घेतलेल्या बुशराच्या पतीने हे वृत्त फेटाळून लावले. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2015 मध्ये इमरान यांनी वयाच्या 60 व्या वर्षी बीबीसीच्या पत्रकार रेहाम खान यांच्याशी दुसरा विवाह केला होता. मात्र, त्यांचे संसार फक्त 10 महिने टिकले.

 

- इमरान आणि रेहाम यांचा विवाह फक्त 10 महिनेच टिकले. पाकिस्तानी मीडियाने त्यावरून विविध प्रकारचे वृत्त दिले होते. 
- रेहाम खानने खुलासा केला होता, की इमरान त्यांच्या खासगी आयुष्यात वेळोवेळी दखल देत होते. याच कारणावरून दोघांमध्ये वाद वाढत गेले. 
- यानंतर इमरान खान यांनी मोबाइलवर मेसेज पाठवून रेहाम खानला तलाक दिला. रेहामच्या मते, इमरान महिलांना दबावाखाली ठेवतात. 

कोण आहेत रेहाम खान
- रेहाम खान खान पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश पत्रकार आहेत. त्यांचे कुटुंबीय मूळचे खैबर पख्तुनख्वा प्रांतातील आहेत. 
- वयाच्या 19 व्या वर्षी रेहाम यांचा निकाह आपलेच चुलत भाऊ एजाज रहमान यांच्याशी झाला होता.
- घटस्फोटापूर्वी या दोघांना तीन अपत्ये झाली होती. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, रेहाम खान यांचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...