आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुत्र्यांमुळे इमरान खानचे तिसरे लग्न अडचणीत, माहेरी शिफ्ट झाली पत्नी बुशरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तान तहरीक ए-इन्साफचे नेते आणि माजी क्रिकेटर इमरान खान यांचे तिसरे विवाह सुद्धा अडचणीत सापडले आहे. त्यांची तिसरी पत्नी बुशरा नाराज होऊन माहेरी गेली आहे. या संपूर्ण प्रकरणाचे कारण कुत्री असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी दैनिक टाइम्स ऑफ इस्लामाबादच्या वृत्तानुसार, इमरान यांची पत्नी बुशरा कुत्र्यांमुळे झालेल्या वादानंतर घर सोडून माहेरी गेली आहे. 

 

असे आहे प्रकरण
टाइम्स ऑफ इस्लामाबादच्या वृत्तानुसार, धर्मगुरु असलेल्या बुशरा यांना कुत्री मुळीच आवडत नाही. त्यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर इमरान यांनी आपल्या पटियाला हाऊस येथून दुसरीकडे हलवण्यात आले होते. त्याच कुत्र्यांना पुन्हा पटियाला हाऊसमध्ये आणल्यानंतर ते घराच्या चारही बाजूंनी फेरफटका मारत आहेत. त्यावरूनच बुशरा इतक्या संतापल्या की त्यांनी घर सोडून माहेर जाण्याचा निर्णय घेतला. 

 

बुशरा एक धार्मिक गुरु असल्याने त्यांना कुत्री आवडत नाहीत. काही पाकिस्तानी माध्यमांमध्ये आता इमरान यांनी त्यांचा एक कुत्रा शेरा याला मारून टाकल्याच्या अफवा देखील उडत आहेत. इमरान खानने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी धर्मगुरू बुशरा यांच्याशी तिसरा विवाह केला. अतिशय गुपचुप पद्धतीने झालेल्या या विवाहानंतर इमरान यांची कुत्री दुसरीकडे हालवण्यात आली होती.

 

पुढील स्लाइडवर वाचा, आणखी एक कारण, ज्यावरून घटस्फोट घेऊ शकतात इमरान खान

बातम्या आणखी आहेत...