आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरबजित हत्येप्रकरणी तुरुंग अधीक्षकाचा जबाब नोंदवला; पाकच्या न्याय यंत्रणेस आता जाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- सरबजित सिंगच्या हत्येप्रकरणात पाकिस्तानची न्याययंत्रणा चार वर्षांनंतर जागी झाली आहे. २०१३ च्या खटल्यात लाहोर सत्र न्यायालयाने मंगळवारी तुरुंग अधीक्षकाचा जबाब नोंदवला आहे. सरबजित सिंगची तुरुंगात काही कैद्यांनी हत्या केली होती.  


आमीर सरफराज उर्फ तांबा आणि मुदस्सर या कैद्यांनी ४९ वर्षीय सरबजितवर कोट लखपत तुुरुंगात हल्ला केला होता. त्यात सरबजितचा मृत्यू झाला होता. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अमीन हैदर यांनी मंगळवारी कोट लखपत तुरुंगाचे अधीक्षकासह अन्य दोन साक्षीदारांचेदेखील जबाब घेतले. आता या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे, असे तुरुंग अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले.  न्यायमूर्ती मजहर अली अकबर नक्वी यांच्या नेतृत्वाखालील एक सदस्यीय न्यायिक आयोगाने सरबजितच्या हत्येचा तपास केला होता. आता लाहोरच्या सत्र न्यायालयात त्याबाबतची सुनावणी सुरू झाली आहे. नक्वी यांनी किमान ४० साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. त्यासंबंधीची तथ्ये मात्र अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाहीत. दरम्यान, पंजाब प्रांतात १९९० मध्ये झालेल्या स्फोटात १४ पाकिस्तानींचा मृत्यू झाला होता. त्यास सरबजित जबाबदार असल्याचा ठपका ठेवून पाकिस्तानच्या न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती.  


अद्याप एकही जबाब नाही 

एकसदस्यीय आयोगाने सूचना केल्यानंतरही अद्यापही सरबजितच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदला नाही.  कुटुंबियांनी मृत्यूबाबतचा पुरावाही दिला नाही.  

 

गुन्ह्याची कबुली 

लाहोर, फैसलाबाद येथील स्फोटाचा सूड घेण्यासाठी सरबजितची हत्या केल्याचे सांगून तांबा आणि मुदस्सर यांनी गुन्ह्याची स्पष्ट कबुली दिली आहे. त्यानंतरही पाकिस्तानात वेगाने कारवाई होऊ शकली नाही.  

 

बातम्या आणखी आहेत...