आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Congress Leader V Hanumantha Rao Criticised Mani Shankar Aiyar For His I Love Pakistan Because I Love India Remark Saying He Might Be Expelled From The Party.

संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानची तयारी आहे, मात्र भारताची नाही: मणिशंकर अय्यर यांचे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित फोटो. - Divya Marathi
संग्रहित फोटो.

कराची-  भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानची तयारी आहे, मात्र भारताची नाही, असे वक्तव्य काँग्रेसमधून निलंबित झालेले नेते मणिशंकर अय्यर यांनी कराची लिट फेस्टिव्हलमध्ये केले आहे.

 


'भारत आणि पाकिस्तान या देशांतील संबंध सुधारण्यासाठी सातत्याने आणि कुठल्याही अडथळ्याविना बातचित होणे, हा एकच मार्ग आहे. पाकिस्तानने हे धोरण स्वीकारल्याचा मला अभिमान आहे, मात्र भारताने ते स्वीकारले नसल्याचे दुःख आहे' असे मणिशंकर अय्यर म्हणाले. 'माझे भारतावर जितकं प्रेम आहे, तितकेच पाकिस्तानवरही आहे' अशा शब्दात अय्यर यांनी पाकिस्तानची तारीफ केली. 'शेजारी देशावरही मातृभूमीप्रमाणे प्रेम करा' असा सल्लाही मणिशंकर अय्यर यांनी भारताला दिला. अय्यर यांच्या वक्तव्यानंतर कराची लिट फेस्टमध्ये उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यापूर्वी गुजरात निवडणुकांच्या वेळी पंतप्रधान मोदींवर टीका करुन अय्यर यांनी वाद ओढावून घेतला होता. त्यानंतर काँग्रेस पक्षातून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...