आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकचा सर्वात धनाढ्य उमेदवार; अपक्ष असूनही 40 हजार कोटी, निम्म्या शहराचा मालक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानात नॅशनल अॅसेंबली निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 25 जुलै रोजी यासाठी मतदान घेतले जाणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एका अपक्ष उमेदवाराच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत. मुहम्मद हुसैन शेख असे त्या उमेदवाराचे नाव असून त्याने आपली संपत्ती तब्बल 40 हजार कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. तो खासदारकीसह आमदारकी सुद्धा लढवत आहे. आतापर्यंत आलेल्या उमेदवारांच्या तुलनेत मुहम्मद हुसैन शेख सर्वात धनाढ्य उमेदवार आहे.


अर्ध्या शहराचा एकटा मालक
पाकिस्तानी दैनिक डॉनच्या वृत्तानुसार, शेख नॅशनल अॅसेंबलीच्या एनए-182 आणि पंजाब विधानसभेत मुजफ्फरगडच्या पीपी-270 येथून निवडणुकीच्या रिंगणात आहे. शेखने दावा केला आहे, की मुज्जफरगड जिल्ह्यातील एकूण जमीनीपैकी 40 टक्के भूखंडाचा तो मालक आहे. या जमीनीच्या मालकी हक्कासाठी अजुनही कोर्टात खटले सुरू आहेत. गेल्या 88 वर्षांपासून तो आणि त्याचे पूर्वज हा कायदेशीर लढा देत आहेत.


कोर्टानेही दिली मान्यता
पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश मिया शाकिब निसार यांच्या नेतृत्वाखाली 3 सदस्यीय खंडपीठाने नुकतेच शेखच्या पक्षात निकाल दिला. त्यानुसारच शेखने आपल्या उमेदवारी अर्जात संपत्तीचा दाखला दिला. कागदपत्रांचा विचार केल्यास शेखच्या मालकीच्या असलेल्या फक्त मुजफ्फरगड येथील जमीनीची किंमत 30 ते 40 हजार कोटी रुपये आहे. या व्यतिरिक्त इतर शहरांमध्ये सुद्धा शेख आणि त्याच्या कुटुंबियांची संपत्ती आहे. त्याच्या मालकी हक्कासाठी सुद्धा तो कायदेशीर लढा देत आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाज आणि माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचा मुलगा बिलावल सुद्धा शर्यतीत आहे. परंतु, त्यांनी दाखल केलेल्या अर्जातील संपत्तीची सुद्धा शेखच्या मालमत्तेशी तुलना होऊ शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...