Home | International | Pakistan | Nawaz Sharif Finally Admits Pakistani Terrorist Behind Mumbai Attacks

26/11 च्या हल्ल्यामागे पाकिस्तानी अतिरेकीच : शरीफ यांची कबुली

वृत्तसंस्था | Update - May 13, 2018, 01:24 AM IST

भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर पाकिस्तानमध्ये पंतप्रधानपदावरून बडतर्फ झालेले नवाझ शरीफ यांनी प्रथमच पाक दहशतवाद्यांना अभय दे

 • Nawaz Sharif Finally Admits Pakistani Terrorist Behind Mumbai Attacks

  इस्लामाबाद - भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर पाकिस्तानमध्ये पंतप्रधानपदावरून बडतर्फ झालेले नवाझ शरीफ यांनी प्रथमच पाक दहशतवाद्यांना अभय देत असल्याचे मान्य केले आहे. तसेच २६/११ चा मुंबई हल्ला पाकिस्तानातून गेलेल्या अतिरेक्यांनीच केल्याचेही कबूल केले. २००८ मध्ये झालेल्या या हल्ल्यात १६६ लोक मृत्युमुखी पडले होते.


  एका मुलाखतीत नवाझ शरीफ म्हणाले की, दहशतवादाला मदत केल्यामुळेच पाकिस्तान जगात एकटा पडला आहे. देशात दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. भलेही ते पाकिस्तानी नसतील, परंतु त्यांना मुंबईत १५० लोकांचा जीव घेण्याची परवानगी द्यायला हवी का? ही सुनावणी आपण पूर्ण करू शकत नाही? रशियन राष्ट्रपती पुतीन आणि चीनचे शी जिनपिंग हे नेतेही याच मुद्द्यावर बाेलले आहेत.


  वास्तविक मुलाखतीमध्ये नवाझ शरीफ यांना त्यांचे पंतप्रधानपद का गेले, असा प्रश्न विचारला होता. मात्र, हा मुद्दा त्यांनी बोलता बोलता परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेकडे वळवला. आज कितीही आेरडून सांगितले तरी पाकिस्तानचे कुणीच ऐकून घेत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

  लष्कर-कोर्टावरही टीका
  नवाझ शरीफ यांनी लष्कर व न्यायपालिकेत असलेले मतभेदही बोलून दाखवले. एकाच वेळी दोन-तीन समांतर सरकारे चालत असतील तर देशाचा गाडा कसा चालणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. घटनात्मक मार्गाने निवडलेले एकच सरकार असू शकते, असेही शरीफ म्हणालेे.

  पाकमध्ये १० वर्षांनंतरही कुणालाच शिक्षा नाही
  लष्कर-ए-तोयबाच्या १० अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. हे सर्व अतिरेकी पाकिस्तानातूनच भारतात आले होते. या हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद आणि मौलाना मसूद अझहर बिनधास्त दहशतवादी संघटना चालवत आहेत. या हल्ल्याला १० वर्षे उलटून गेली तरी अजून पाकिस्तानात कुणालाच शिक्षा झालेली नाही. रावळपिंडीत दहशतवादविरोधी कोर्टात सुनावणी प्रलंबित आहे. अनेक पाकिस्तानी अधिकारी व लोकांनी आरोपींविरुद्ध साक्ष दिली आहे. मात्र, केवळ भारतीय साक्षीदारांसाठी सुनावणी थांबली आहे.

 • Nawaz Sharif Finally Admits Pakistani Terrorist Behind Mumbai Attacks
 • Nawaz Sharif Finally Admits Pakistani Terrorist Behind Mumbai Attacks
 • Nawaz Sharif Finally Admits Pakistani Terrorist Behind Mumbai Attacks

Trending