Home | International | Pakistan | Nawaz Sharif, Mary Names in ECL's list

नवाझ शरीफ, मरियम यांना देशाबाहेर जाण्यास मनाई; ‘ईसीएल’च्या यादीत टाकली नावे

वृत्तसंस्था | Update - Jul 11, 2018, 08:38 AM IST

पाकिस्तान सरकारने मंगळवारी पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाझ यांची नावे देशाबाहेर पडण्यावर नियंत्

  • Nawaz Sharif, Mary Names in ECL's list

    लाहोर- पाकिस्तान सरकारने मंगळवारी पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाझ यांची नावे देशाबाहेर पडण्यावर नियंत्रण असणाऱ्या 'एक्झिट कंट्रोल लिस्ट'(ईसीएल)मध्ये समाविष्ट केली आहेत. दोघे शुक्रवारी पाकिस्तानात येणार आहेत, त्यानंतर ते परत परागंदा होऊ नयेत, यासाठी त्यांचा समावेश ईसीएलमध्ये करण्यात आला आहे.

    भ्रष्टाचाराची प्रकरणे हाताळणाऱ्या इस्लामाबादमधील न्यायालयाने शरीफ व मरियम यांना भ्रष्टाचाराच्या पैशातून लंडन येथील एव्हेनफिल्डमध्ये सदनिका घेतल्याच्या आरोपाखाली अनुक्रमे दहा व सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ईसीएलमध्ये नाव असलेल्या व्यक्तींना देशाबाहेर पडण्यास मनाई असते. शरीफ यांची पत्नी कुलसुम नवाझ यांच्यावर लंडनमध्ये घशाच्या कर्करोगावर उपचार सुरू आहेत. १४ जून रोजी कुलसुम यांना हृदयविकाराचा झटका बसल्यानंतर त्या व्हेंटिलेटरवर आहेत. राष्ट्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाला केलेल्या विनंतीनुसार शरीफ व कुलसुम यांची नावे ईसीएलमध्ये टाकण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. शरीफ व मरियम देशातील कोणत्याही विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना अटक केली जाईल, असे नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) जाहीर केले आहे.


    शरीफ व मरियम यांच्या लाहोर विमानतळावर आगमनानंतर इस्लामाबादमध्ये नेण्यासाठी एनएबीने काळजीवाहू सरकारकडे हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. याशिवाय रस्त्याच्या मार्गाने जावे लागल्यास सुरक्षेची आवश्यक काळजी घेण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

Trending