आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-इस्रायलने मुस्लिमांची जमीन हडपली, आम्ही दोघांचाही सामना करण्यास सक्षम : पाकिस्तान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसिफ म्हणाले, भारताने काश्मीरमध्ये मुस्लीमांची जमीन हडपली. इस्रायलनेही हेच काम मोठ्या प्रमाणावर केले. पाकिस्तान या दोन्हींचा सामना करण्यास सक्षम आहे. - Divya Marathi
आसिफ म्हणाले, भारताने काश्मीरमध्ये मुस्लीमांची जमीन हडपली. इस्रायलनेही हेच काम मोठ्या प्रमाणावर केले. पाकिस्तान या दोन्हींचा सामना करण्यास सक्षम आहे.

इस्लामाबाद/नवी दिल्ली - इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या भारत दौऱ्यावर पाकिस्तानने करडी नजर ठेवली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, भारत आणि इस्रायल मिळून आघाडी तयार करत आहे. आसिफ म्हणाले, भारताने काश्मीरमध्ये मुस्लीमांची जमीन हडपली. इस्रायलनेही हेच काम मोठ्या प्रमाणावर केले. पाकिस्तान या दोन्हींचा सामना करण्यास सक्षम आहे. नेतन्याहूंच्या भारत दौऱ्यादरम्यान 9 करारांवर सह्या करण्यात आल्या. त्यात डिफेन्स क्षेत्राचाही समावेश आहे. 


भारत - इस्रायलचा उद्देश एकच 
- पाकिस्तानच्या ‘जियो न्यूज’ ला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांनी अनेक मुद्द्यांवरील मते मांडली. 
- एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, भारताने काश्मीरमध्ये मुस्लीमांच्या जमिनीवर ताबा घेतला आहे. इस्रायलने पॅलेस्टाइनची बरीच जमीन हडपली आहे. खरं तर या दोन्ही देशांचा उद्देश एकच आहेत. तो म्हणजे मुस्लीमांची जमीन हडपण्याचा. 


दोन्ही देश इस्लामचे शत्रू 
- एका प्रश्नाचे उत्तर देताना आसिफ म्हणाले, पाकिस्तानने कधीही इस्रायलला मान्यता दिली नाही. भारत आणि इस्रायलच्या मैत्रीचा पाया इस्लामशी असलेले शत्रूत्व हा आहे. आमचे पॅलेस्टाईनबरोबर भावनिक नाते आहे. काश्मीरबरोबरही तसेच आहे.  
- ते म्हणाले, भारत आणि इस्रायल यांच्या मैत्री आहे हे खरे आहे. पण पाकिस्तान या दोन्ही शक्तींपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो. 


दहशतवादाविरोधी लढा सुरू राहणार 
- एका प्रश्नाच्या उत्तरात आसिफ म्हणाले की, पाकिस्तान दहशतवादाचा सामना करत आहे. आमचे लष्कर शक्तीशाली आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढ्यात आम्ही यशस्वी झालो असून आम्ही त्यासाठी बलिदानही दिले आहे. 
- त्यापूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक वक्तव्य प्रसिद्ध करत म्हटले होते की, भारत आणि इस्रायलच्या नात्यांवर त्यांची नजर आहे. व्यावसायिक करारांसह लष्करी करारही झाले आहेत. पाकिस्तानचे त्याकडे लक्ष आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...