Home | International | Pakistan | Pakistan Coal Mine Blast Kills 18 Injures Dozens Of Worker In Quetta

पाकिस्तानच्या कोळसा खाणीत गॅसचा स्फोट, 18 मजुरांचा दबून मृत्यू, अनेक जण जखमी

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 06, 2018, 04:21 PM IST

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात खाणकाम सुरू असताना अचानक गॅस ब्लास्ट झाला.

  • Pakistan Coal Mine Blast Kills 18 Injures Dozens Of Worker In Quetta

    क्वेटा - पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात खाणकाम सुरू असताना अचानक गॅस ब्लास्ट झाला. या स्फोटात 18 मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तसेच अनेक मजूर जखमी झाले आहेत. पाकिस्तानी दैनिक डॉनच्या वृत्तानुसार, क्वेटा शहरातील मारवार परिसरात शनिवारी खाणकाम सुरू होते. त्यावेळी मुख्य खाणीत मिथेन वायूची गळती झाली आणि इतर खाणींमध्ये पोहोचली. त्यामुळे येथील खाणीत स्फोट झाला. ब्लास्टच्या वेळी आतमध्ये मजूर काम करत होते. याच परिसरात असलेल्या दुसऱ्या खाणीत दरळ कोसळली. त्यामुळे दोन्ही खाणींमध्ये झालेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा 18 पर्यंत गेला.


    पाकिस्तानच्या खाणकामांचे चीफ इंस्पेक्टर इफ्तिखार अहमद यांनी दुर्घटनेची माहिती जाहीर केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यांनी एकट्या मारवार येथील खाणीतून 11 मजुरांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. सोबतच दुसऱ्या खाणीत सुद्धा बचावकार्य सुरू आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात असून काहींची परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.


    पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, स्फोट झाला त्यावेळी मारवार येथील खाणीत 28 जण काम करत होते. ते सगळेच स्वात येथील रहिवासी आहेत. मृतदेहांची अवस्था इतकी वाइट होती. की त्यांना ओळखणे देखील कठिण बनले आहे. खाणीत झालेला ढिगारा पाहता, बचावकार्य पूर्ण करण्यासाठी 2 दिवस लागतील. तर दुसरीकडे, पाकिस्तानच्या केंद्रीय खाण कामगार संघटनेने या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला असा दावा केला आहे.

  • Pakistan Coal Mine Blast Kills 18 Injures Dozens Of Worker In Quetta
  • Pakistan Coal Mine Blast Kills 18 Injures Dozens Of Worker In Quetta

Trending