Home | International | Pakistan | पाकिस्तानची झैनब कठुआतील पीडित, Pakistan Court Death Sentence For Rapist In Zainab Case

पाकिस्तानात 7 वर्षीय मुलीवर रेप झाला, तेव्हा 1000 लोकांना पकडले, 4 दिवसांत फाशी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 18, 2018, 02:10 PM IST

कठुआ येथे झालेल्या 8 वर्षीय मुलीवर अमानुष कृत्यावर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

 • पाकिस्तानची झैनब कठुआतील पीडित, Pakistan Court Death Sentence For Rapist In Zainab Case

  स्पेशल डेस्क - कठुआ येथे झालेल्या 8 वर्षीय मुलीवर अमानुष कृत्यावर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विविध ठिकाणी मोर्चे काढून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. पण, त्याच आरोपींच्या समर्थानातही काही लोक मोर्चे काढताना दिसून आले. त्याच समर्थकांपैकी 2 भाजप मंत्र्यांना राजीनामा देखील द्यावा लागला. पाकिस्तानवर इतर मुद्द्यांवर कितीही टीका करण्यात येत असली तरीही बलात्काराच्या एका प्रकरणात आपल्या शेजारील राष्ट्राने एक आदर्श उदाहरण प्रस्तुत केले. पाकिस्तानात एका 7 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला होता. त्या प्रकरणात पाकिस्तानने 4 दिवसांत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.


  घेतली 1000 संशयितांची DNA चाचणी
  - पाकिस्तानच्या कसूर परिसरात 5 जानेवारी रोजी 7 वर्षी झैनब घरापासून ट्युशनला जात असताना बेपत्ता झाली. चिमुकलीचे आई-वडील सौदी अरेबियाला गेले होते. तसेच ही चिमुकली आपल्या आजोबांकडे राहत होती.
  - पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली तेव्हा पोलिसांनी वेळ वाया न घालवता परिसरातील सर्वच सीसीटीव्ही फुटेज चेक केले. तेव्हा ती एका अनोळखी व्यक्तीचा हात धरून हात असल्याचे दिसून आले.
  - यानंतर 9 जानेवारी रोजी शहबाज रोडवर जेव्हा झैनबचा मृतदेह सापडला तेव्हा जणु अख्खा पाकिस्तान पेटून उठला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्या मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले.
  - पाकिस्तानच्या नागरिकांनी हे प्रकरण इतके पेटवले, की पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यात दिवस रात्र एक केले. या प्रकरणात पोलिसांनी 1000 हून अधिक संशयितांना अटक केली. तसेच त्या सर्वांची डीएनए चाचणी घेतली.

  4 दिवसांच्या सुनावणीत फाशी
  - कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांना झैनबच्याच शेजाऱ्यावर संशय वाढला. पोलिसांनी त्याची देखील डीएनए चाचणी घेतली आणि त्याचा डीएनए मॅच झाला.
  - 23 जानेवारी रोजी पोलिसांनी झैनबचा शेजारी इमरान अली याला बेड्या ठोकल्या. 12 फेब्रुवारी रोजी त्याला कोर्टाने अल्पवयीन मुलीचे अपहरण, बलात्कार, हत्या आणि अनैसर्गिक कृत्य अशा सर्व आरोपांत दोषी मानत फासावर लटकवण्याची शिक्षा सुनावली.
  - या प्रकरणाची सुनावणी विशेष फास्ट ट्रॅक कोर्टात झाली. पाकिस्तान हे पहिलेच प्रकरण होते, ज्याची सुनावणी अवघ्या 4 दिवसांत पूर्ण झाली.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेशी संबंधित आणखी काही फॅक्ट्स...

 • पाकिस्तानची झैनब कठुआतील पीडित, Pakistan Court Death Sentence For Rapist In Zainab Case

  पाकिस्तानची प्रसिद्ध वृत्तवाहिनी समा टीव्हीच्या एका अँकरने आपल्या मुलीवर मांडीवर घेऊन लाइव्ह बुलेटिन केले होते. तसेच पाकिस्तानचे नागरिक, नेते आणि साऱ्या जगाला बलात्कार प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. तिचा हा फोटो आणि व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला तसेच तोंडभर कौतुकही झाले.

 • पाकिस्तानची झैनब कठुआतील पीडित, Pakistan Court Death Sentence For Rapist In Zainab Case

  पोलिसांना चिमुकली बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी परिसरातील सर्वच सीसीटीव्ही खांगाळले आणि त्यांना हा व्हिडिओ सापडला. त्यामध्ये झैनब एका अनोळखी व्यक्तीचा हात धरून जात असतानाचे सापडले.

 • पाकिस्तानची झैनब कठुआतील पीडित, Pakistan Court Death Sentence For Rapist In Zainab Case

  झैनब प्रकरणातील तो नराधम. इमरान नाव असलेल्या या नराधमाला पोलिसांनी अटक करून कोर्टात सादर केले तेव्हा कोर्टाने त्याला 4 दिवसांत फाशी सुनावली. तो हायकोर्टातही गेला. पण, लाहोर हायकोर्टाने त्याची याचिका स्पष्टपणे फेटाळली.

 • पाकिस्तानची झैनब कठुआतील पीडित, Pakistan Court Death Sentence For Rapist In Zainab Case

  झैनबचे आजोबा आपल्या नातूचा एक फोटो मीडियाला दाखवताना...

Trending