आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांवर जीवघेणा हल्ला, पोटात गोळी लागली; हल्लेखोरास अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपचारासाठी रुग्णालयात नेताना... - Divya Marathi
उपचारासाठी रुग्णालयात नेताना...

इस्लामाबाद - पाकिस्तानचे केंद्रीय गृहमंत्री एहसान इकबाल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून ते या हल्ल्यातून बालंबाल बचावले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. त्याचे वय फक्त 22 वर्षे असून त्याने केंद्रीय मंत्र्यांवर गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. तरीही या हल्ल्यामागे मास्टरमाइंड कोण, याचा शोध पोलिस घेत आहेत. 


> केंद्रीय मंत्री एहसान इकबाल आपला मतदार संघ नरोवल येथे एका सभेला संबोधित करत होते. त्याचवेळी त्यांना लक्ष्य करून अज्ञाताने गोळीबार केला. या गोळीबारात एक गोळी त्यांच्या खांद्याला लागून निसटून गेली असे सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी नंतर यात बदल करत त्यांच्या पोटात गोळी लागली असे स्पष्ट केले. 
> घटनास्थळावरूनच संशयित आरोपी आबिद हुसैन याला अटक करण्यात आली आहे. इकबाल यांचे भाषण संपताच, आबिद हुसैनने अवघ्या 15 यार्ड अंतरावरून 30 बोअरच्या बंदूकीने गृहमंत्र्यांवर फायर केला. पाकिस्तानी दैनिक डॉनच्या वृत्तानुसार, हल्लेखोर आणखी फायरिंग करणार होता. तेवढ्या प्रत्यक्षदर्शींनी वेळीच हल्लेखोराला पकडून त्याला दूर नेले आणि पोलिसांनी मध्यस्थी करत आरोपीला अटक केली. 
> गृहमंत्र्यांना सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण, पुढील शस्त्रक्रियेसाठी त्यांना हेलिकॉप्टरने लाहोरच्या रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले. या वेळी पंजाबचे मुख्यमंत्री शहबाज शरीफ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
> लाहोरच्या रुग्णालयाने दिलेल्या मेडिकल रिपोर्टनुसार, इकबाल यांच्या हाताला लागून गोळी निसटली आणि पोटात गेली. त्यांच्या पोटातून गोळी बाहेर करण्यासाठी डॉक्टरांना सर्जरी करावी लागली. ते सध्या शुद्धीवर असून आसपासच्या लोकांशी संवाद साधत आहेत. 


राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून तीव्र निषेध
> या घटनेचा पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसैन यांच्यासह पंतप्रधान खाकान अब्बासी यांनीही तीव्र शब्दात निषेध केला. सोबतच माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कन्या मरियम नवाज यांनी सुद्धा निषेध करताना प्रशासकीय सुरक्षा यंत्रणेवर सवाल उपस्थित केले. 
> नवाज शरीफ यांनी सांगितल्याप्रमाणे, हल्लेखोर फक्त बाइकवर आला होता. त्याच्याकडे बंदूक आहे, किंवा तो काही करू शकतो याची कल्पना प्रशासनाला आली कशी नाही. राजकीय नेते अशा लोकांना भडकावून त्यांचा वापर करून घेतात असे म्हणत, मरियम नवाज यांनी यामागे मास्टरमाइंड असल्याचा संशय व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...