Home | International | Pakistan | Pakistan Might Be On The Verge Of Bankruptcy

अवघ्या 10 आठवड्यांत भिकारी होणार पाकिस्तान, चीनही करू शकणार नाही मदत

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 31, 2018, 01:11 PM IST

पाकिस्तानकडे आता केवळ 10.3 अब्ज अमेरिकन डॉलर इतकेच परदेशी चलन आहे. यातून फक्त 10 आठवडे आयात केली जाऊ शकते.

 • Pakistan Might Be On The Verge Of Bankruptcy

  इस्लामाबाद - भ्रष्टाचारामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून नवाज शरीफ यांचा राजीनामा, पीएम खाकान अब्बासी यांच्यावर विरोधकांचा अविश्वास आणि नव्या पंतप्रधानाचा शोध अशात पाकिस्तान राजकीयदृष्ट्या अस्थिर आहे. तर दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तानी चलनाची किंमत दिवसेंदिवस घसरत आहे. एका अमेरिकन डॉलरची किंमत 115 पाकिस्तानी रुपये आहे. पाकिस्तानच्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हमध्ये खडखडाट आहे. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानकडे आता केवळ 10.3 अब्ज अमेरिकन डॉलर इतकेच परदेशी चलन आहे. यातून फक्त 10 आठवडे आयात केली जाऊ शकते.


  चीनकडे हात पसरवतोय पाकिस्तान
  > पाकिस्तानचे प्रमुख दैनिक 'द डॉन' च्या वृत्तानुसार, आर्थिक बकालीचा निपटारा करण्यासाठी पाकिस्तानने पुन्हा चीनला साकडे घातले आहे. तसेच चीनकडून पाकला 2 अब्ज अमेरिकन डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता आहे.
  > रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पाकिस्तानने चीन आणि चिनी बँकांकडून घेतलेले कर्ज यावर्षी 5 अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत जाऊ शकते. फायनान्शियल टाइम्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानकडे सध्या जितका पैसा आहे, त्यातून फक्त 10 आठवडे आयात केली जाऊ शकेल.
  > पाकिस्तानात जुलैमध्ये राष्ट्रीय निवडणुका होणार आहेत. अशात पाकिस्तान आयएमएफकडे सुद्धा हात पसरवू शकतो. 2013 मध्ये सुद्धा पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) कडून मदत मागितली होती.
  > अर्थतज्ञांच्या मते, पाकिस्तान या संकटातून सावरण्यासाठी सौदी अरेबियाची सुद्धा मदत घेऊ शकतो. वर्ल्ड बँकेने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानला इशारा दिला होता, की त्यांना आर्थिक बकालीपासून वाचण्यासाठी 17 अब्ज अमेरिकन डॉलरची गरज आहे.


  हे आहे कारण...
  फायनान्शियल टाइम्सच्या वृत्तानुसार, परदेशात नोकरी करणारे पाकिस्तानी देशात पैसे पाठवत होते. परंतु त्यामध्ये आता घट झाली आहे. सोबतच पाकिस्तानचे आयात निर्यातीपेक्षा खूप अधिक आहे. आयातीमध्ये जशी वाढ होत आहे, तेवढीच निर्यातीमध्ये घट दिसून येते. सोबतच, चीन-पाक आर्थिक कॉरिडोरच्या कामासाठी लागलेल्या कंपन्यांना देखील फॉरेन करंसी द्यावी लागते. हीच पाकिस्तानची तिजोरी रिकामी होण्याची प्रमुख कारणे आहेत. पाकिस्तानच्या सेंट्रल बँक अधिकाऱ्याने परदेशातील धनाढ्य पाकिस्तानींना आकर्षित करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना चांगल्या ऑफर दिल्यास ते पाकिस्तानात परदेशी चलन पाठवतील जेणेकरून पाकिस्तानला मदत होऊ शकते.


  चीनचा गुलाम होण्याची भिती...
  - डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांनी आपल्या धोरणांमध्ये मुस्लिम देशांसाठी कठोर धोरणे लागू केली. त्याचा फटका पाकिस्तानला बसला आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारी मदत कापण्यात आली. तसेच पुढे सुद्धा यात कपात केली जाणार आहे.
  - अमेरिकेपासून दुरावल्यानंतर पाकिस्तानला चीनकडे शरण जावे लागले आहे. श्रीलंका आधीच चीनकडून कर्ज घेऊन अडकला आहे. श्रीलंकेला आपले हंबनटोटा बंदर चीनला 99 वर्षे लीझवर द्यावे लागले आहे. आता पाकिस्तान सुद्धा त्याच मार्गावर जात आहे. अशात पारकिस्तान सुद्धा चीनचा गुलाम होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे.

 • Pakistan Might Be On The Verge Of Bankruptcy

Trending