आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fitness Challenge: राज्यवर्धन सिंह राठोड नव्हे, या पाकिस्तानी मंत्र्याने केली सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - देशभर सोशल मीडियावर फिटनेस चॅलेंज चर्चेत आहे. याची सुरुवात केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी केली. तसेच विराट, हृतिक रॉशन आणि इतरांना आव्हान दिले. त्या सर्वांनी इतरांना चॅलेन्ज दिल्याने यानंतरही चेन सुरूच आहे. भारतात या सुरुवातीचे श्रेय केंद्रीय मंत्री राठोड यांना   जात असले तरीही 2 वर्षांपूर्वी हुबेहूब अशाच प्रकारचे फिटनेस चॅलेंज युवा पाकिस्तानी मंत्र्याने सुद्धा दिले होते. 2016 मध्ये पाकिस्तानी मंत्री मोहम्मद बक्श महर यांनी या चॅलेंजची सुरुवात पाकिस्तानातून केली होती. पाकिस्तानच्या दिवंगत माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचा मुलगा बिलावल भुत्तो यांचे ते जवळचे मित्र आहेत.


40 सेकंदात काढले 50 पुशअप्स...
> 2016 मध्ये सिंध प्रांताचे क्रीडा मंत्री महर यांनी सोशल मीडियावरून पंजाब प्रांताचे क्रीडा मंत्री आणि इतर मंत्र्यांना फिटनेस चॅलेंज दिले होते. त्यांनी अवघ्या 40 सेकंदांत 50 पुश-अप्स लावले होते. तसेच सोशल मीडियावर तो व्हिडिओ पोस्ट केला होता. 
> व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले होते, की मला 50 पुश-अप्सच्या बाबतीत कुणीच पछाडू शकणार नाही. आपण एक स्पोर्ट्सपर्सन असून दररोज 3 तास व्यायाम करतो असे ते म्हणाले होते. 
> यानंतर पाकिस्तान सरकारमध्ये पाणी पुरवठा आणि ऊर्जा मंत्रालय सांभाळणारे आबिद शेर अली यांनी पुश-अपपेक्षा भयानक व्हिडिओ पोस्ट केला जो व्हायरल झाला. तसेच उलट महर यांनाच चॅलेंज दिले. त्यांनी 100 किलो वजन उचलले होते. 
> यानंतर मेहर थांबले नाहीत. त्यांनी सोशल मीडियावरूनच आबिद यांना रेसलिंगचे आव्हान दिले. कित्येक दिवस पाकिस्तानी मीडियामध्ये मंत्र्यांचे चॅलेंज आणि व्हिडिओ चर्चेचा विषय ठरले होते. सोबतच राजकीय पातळीवर त्यांना मोठ्या टीकेला सुद्धा सामोरे जावे लागले. तेच चलन भारतात राज्यवर्धन सिंह राठोड यांनी सुरू केले आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, फिटनेससाठी प्रसिद्ध पाक मंत्र्याचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...