आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावळपिंडीतील हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाक सरकारने जारी केले 2 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पंजाब प्रांत सरकारने रावळपिंडीतील कृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हा निधी मंदिरात पूजा आणि हिंदू उत्सवांच्या अनुरूप करण्यासाठी वापरला जाणार आहे. 

 

2 शहरांत एकच मंदिर
कृष्ण मंदिर रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये एकमात्र हिंदू मंदिर आहे. येथे नियमित पूजा केली जाते. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळा आरती केली जाते. यात 6 ते 7 जणांचा समावेश असतो. 


लवकरच कामाला सुरुवात
- डॉनच्या वृत्तानुसार, शरणार्थी ट्रस्ट मालमत्ता मंडळ (ईटीपीबी) चे उप-व्यवस्थापक मोहम्मद आसिफ यांनी सांगितले, की पंजाबच्या विधानसभा सदस्यांनी मागणी केली होती. त्यानुसार, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 2 कोटींचा निधी जारी करण्यात आला आहे. 
- लवकरच यासंदर्भातील कामांना सुरुवात होईल. यासाठी विशेष निरीक्षण समिती सुद्धा कार्यरत आहे. नेमका कशा प्रकारचे काम केले जाइल याची योजना आखली जाईल. ज्या ठिकाणी नवीन बांधकाम होईल त्या ठिकाणी प्रवेश तात्पुरता बंद ठेवला जाईल. काम पूर्ण होताच लोकांना पुन्हा प्रवेश दिला जाईल. 


1897 मध्ये झाली स्थापना
- 1897 मध्ये सद्दरमध्ये कांची मल आणि उजागर मल राम पांचाळ यांनी या मंदिराची घटस्थापना केली होती. फाळणीनंतर रावळपिंडीत असलेले एकमेव हिंदू मंदिर ठरले. 
- 1947 नंतर हिंदू समुदायाकडून याची देखरेख केली जाते. पण, 1970 पासून याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ईटीपीबीला सुपूर्द करण्यात आली. 1980 पर्यंत इस्लामाबादेत राहणारे भारतीय राजदूत याच ठिकाणी येऊन पूजा अर्चना करत होते. यानंतर मंदिराचे क्षेत्रफळ वाढवण्याची मागणी उठली. 

 

बातम्या आणखी आहेत...