आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हणूनच, दहशतवादाची फॅक्ट्री आहे पाकिस्तान; घरोघरी शस्त्रांस्त्रांचे कारखाने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी पाकिस्तान दहशतवादांची नाही, तर संतांची भूमी असल्याचा दावा केला आहे. दहशतवाद्यांचे आश्रय स्थळ आणि शेजारील देशांवर हल्ल्यांमुळे बदनाम पाकिस्तान जगात एकटा पडला आहे. संयुक्त राष्ट्रात या देशाला दहशतवाद पुरस्कृत देश घोषित करण्याची मागणी भारतासह अनेक देश करत आहेत. गतवर्षी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि भारताच्या इतर प्रतिनिधींनी यूएनमध्ये जाहीरपणे पाकिस्तानला दहशतवादाची फॅक्ट्री म्हटले आहे. पाकिस्तानला दहशतवादाची फॅक्ट्री का म्हणतात याची प्रचिती तेथील दर्रा आदम खेल परिसराला पाहून नक्कीच येईल. 

 

- पाकिस्तानातील असे एक शहर आहे, ज्या ठिकाणी घरोघरी शस्त्रास्त्रे बनवली जातात. खैबर पख्तुनख्वा येथील दर्रा आदम खेल त्यापैकीच एक शहर आहे. ज्या ठिकाणी एके-47 सह विविध शस्त्रास्त्र स्मार्टफोनपेक्षा स्वस्तात विकले जातात.

- दर्रा आदम खेल येथे शस्त्र बनवणारे इतके तरबेज आहेत ते अँटी-एअरक्राफ्टपासून पेन गनपर्यंत सर्व बनवतात. 
- शस्त्रे विकणा-यांचे म्हणणे आहे, की जगात असे कोणतेही हत्यार नाही, जे आम्ही बनवू शकणार नाही. 
- तो म्हणतो, जर आम्हाला स्ट‍िंगर मिसाइलही दिले तर आम्ही त्याला बनवून टाकू की असली-नकलीमधील फरक करणे अवघड होऊन जाईल. 
- यांनी जे शस्त्र कधी पाहिले नाही तेही केवळ 10 दिवसांमध्‍ये बनवू शकतात. 
- एकदा शस्त्राची पहिली प्रतिकृती बनवल्यानंतर दुसरे फक्त 2-3 दिवस लागते. 
- यांचे हत्यार भलेही खूप जूने असतील, मात्र यापासून बनवण्‍यात येणारे शस्त्र अस्सलच असते. 
- अस्सल शस्त्रांचे सीरियल क्रमांकही या अवैध शस्त्रांवर टाकले जाते.

 

शस्त्र काम करेल की नाही सांगता येत नाही
- हे शस्त्र ओरिजनल शस्त्रांप्रमाणे काम करतील याची गॅरंटी नाही. 
- हाताने स्टीलपासून बनवलेले गन कॉम्प्युटराझ्ड मशीनमधून फॅक्टरीत बनवलेल्या बंदूकीशी मॅच करु शकत नाही. 
- या शस्त्रांमध्‍ये काही गडबड झाली तर त्याचे पार्ट्स परत घेतले जात नाही. खराब झाल्यास ती फेकून द्यावी लागतात. 
- दर्रामध्‍ये हा अवैध शस्त्रांचा उद्योग केव्हा सुरु झाला हे कोणालाही माहित नाही. 
- 1857 मध्‍ये बंडखोरांनी ब्रिटिश लष्‍कराविरुध्‍द हा उद्योग सुरु केल्याचे सांगितले जाते. 
- 1979 मध्‍ये रशियाने अफगाणिस्तानवर हल्ला केल्यावर येथील शस्त्रांची मागणी वाढली.

 

गल्लीबोळात दुकाने
- या गावाच्या गल्लीबोळात अशा प्रकारचे शस्त्र बनवणारे दुकाने आहेत. 
- ही शस्त्रे जहाजातून आणलेल्या भंगार धातूंपासून बनवली जातात. 
- ती बनवण्‍यासाठी फार मोठे उपकरण नसते. तर बारीक हँड टूल व ड्रिलचा वापर केला जातो. 
- या गावातील 75 टक्के लोक अवैध शस्त्र बनवण्‍याचा उद्योग करतात. 
- हा उद्योग एका पिढीपासून दुस-या पिढीकडे सोपवला जातो. 
- यांना नेहमी अफगाणिस्तान व आसपासच्या भागात विकले जातात.

 

सरकारचाही पाठिंबा
- एकेकाळी सरकारचाही शस्त्रांच्या बाजारपेठेला पाठिंबा होता.
- 1988 मध्‍ये रावळपिंडीमध्ये शस्त्रांचा स्फोट झाला. या घटनेनंतर सरकारने शस्त्रांचे भंगार दाराच्या बंदूकवाल्यांना विकले होते. 
- हे शस्त्रे मिळताच बंदूक बनवणा-याने एका रात्रीत त्यांचे तंत्रज्ञान शिकवून घेतले. 
- यानंतर सरकारला वाटले, की दहशतवादी दारामध्‍ये बनवणा-या शस्त्रांचा वापर जेव्हा देशाच्या सैन्याविरुध्‍द करु लागले तेव्हा त्यांच्या बंदी घातली. 
- मात्र येथील 2500 शस्त्रे बनवणा-यांनी सांगितले, की त्यांनाही आपले शस्त्रे दहशतवाद्यांना विकले नाही. 
- दर्रा अदम खेल गावात आताही पाक सरकारचे कायदे लागू होत नाहीत. येथे आजही स्थानिक कायदे पाळले जातात.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, दर्रा आदम खेलचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...