Home | International | Pakistan | Panchmukhi Hanuman Mandir In Karachi City Of Pakistan

पाकिस्तानात आहे हे हनुमान मंदिर, भगवान राम देखील येथे आल्याची आख्यायिका

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 31, 2018, 11:03 AM IST

पाकिस्तानात आहे हे हनुमान मंदिर, भगवान राम देखील येथे आल्याची आख्यायिका

 • Panchmukhi Hanuman Mandir In Karachi City Of Pakistan

  इंटरनॅशनल डेस्क - सीमारेषा ओढल्याने किंवा देशाची फाळणी झाल्यानंतरही त्याचा इतिहास बदलत नाही असे म्हटले जाते. पाकिस्तानात आजही हिंदूंची अनेक ऐतिहासिक मंदिर त्याचीच उदाहरणे आहेत. कराची येथील 1500 वर्षे जुने पंचमुखी हनुमान मंदिर त्यापैकीच एक आहे. या मंदिरातील हनुमान मूर्ती हजारो वर्षे प्राचीन आहे. या ठिकाणी एकेकाळी स्वयं भगवान श्री राम यांचे एकदा आगमन झाले होते अशी अख्यायिका आहे.

  यामुळे खास आहे मंदिर...
  - या मंदिरातील पंचमुखी हनुमान मूर्ती काही सामान्य मूर्ती नाही. कारण, यामध्ये हनुमानाची सर्व पाच रुपे दिसून येतात.
  - या मूर्तीमध्ये नरसिम्हा, आदिवारागा, हयग्रीव, हनुमान आणि गरुड अवतार दिसून येतात. ही मूर्ती मानवनिर्मित नसून निसर्गनिर्मित असल्याचेही म्हटले जाते.
  - पांढऱ्या आणि निळ्या रंगाची 8 फूट उंच अशी मूर्ती शेकडो वर्षांपूर्वी स्थापित करण्यात आली. त्याच ठिकाणी हे मंदिर उभारण्यात आले होते.
  - स्वयं भगवान राम देखील एकदा या ठिकाणी आले होते. या मंदिराच्या 108 फेऱ्या मारल्याने सर्व दुख आणि पीडा दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
  - पाकिस्तानच्या सुरक्षित हिंदू मंदिरांपैकी एक या मंदिरात मराठी, सिंधी आणि बलूच अशा सर्वच समुदायातून लोक दर्शनाला येतात.
  - 1500 वर्षे प्राचीन असलेल्या या मंदिराची अनेक वेळा डागडुजी करण्यात आली. त्यात 18 व्या शतकात हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले असेही म्हटले जाते. यावर शेवटची दुरुस्ती 2012 मध्ये झाली होती.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, या प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिराचे आणखी काही फोटो...

Trending