आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवेझ मुशर्रफला दणका; उमेदवारीचा अर्ज पाकिस्तान निवडणूक आयोगाने फेटाळून लावला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या संसदीय निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफला मंगळवारी मोठा दणका बसला आहे. मुशर्रफांनी निवडणुकीत उभे राहण्यासाठी भरलेला उमेदवारीचा अर्ज पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी फेटाळून लावला आहे. पाकिस्तानी न्यूज पोर्टल डॉनच्या वृत्तानुसार, यासंदर्भात सविस्तर माहिती अद्याप जाहीर करण्यात आली नाही. आयोगाकडून फेटाळल्याचे स्पष्टीकरण दिले जाणार आहे.

 

माजी लष्करशहा मुशर्रफ यांनी ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग (एपीएमएल) या आपल्या पक्षातर्फे उमेदवारीचा अर्ज एनए-1 साठी छित्राल येथून दाखल केला होता. परंतु, निवडणूक आयोगाचे अधिकारी मोहम्मद खान यांनी तो अर्ज रिजेक्ट केला आहे. गेल्या आठवड्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत गैरहजर राहिलेल्या मुशर्रफ यांना न्यायालयाने सशर्त उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली होती. ती अट अशी होती, की मुशर्रफ आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. परंतु, त्यांच्या अर्जाची छानणी ही रिटर्निंग ऑफिसरकडून केली जाईल. ती छानणी पास करण्यासाठी मुशर्रफ यांना कोर्टात वैयक्तिक हजेरी लावावीच लागेल. 

 
फेरविचार अर्ज करण्याचा अधिकार
- इच्छुक उमेदवारांचे अर्ज मिळवण्याची तारीख संपल्यानंतर रिटर्निंग ऑफिसरने छानणी सुरू केली. तसेच अपात्र ठरलेल्या उमेदवारांची घोषणा सुद्धा केली. 
- निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखानुसार, ज्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत, त्यांना 22 जून पर्यंत फेरविचार अर्ज दाखल करता येईल. त्यांच्या विनंतीवर 27 जूनपर्यंत निकाल दिला जाईल. मुशर्रफ यांच्यासह इतर उमेदवारांनाही अर्ज करण्याचा अधिकार आहे.
- 28 जून रोजी नव्याने उमेदवारांची सुधारित यादी जाहीर केली जाईल. त्यात 29 जून रोजी उमेदवारांना आपला अर्ज मागे घेता येणार आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी 30 जून रोजी जाहीर केली जाणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...