रेपच्या बदल्यात रेप! बलात्काऱ्याच्या बहिणीवर कुटुंबियांच्या मर्जीने झाले असे...
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका गावात कुटुंबियांच्या मर्जीनेच एका तरुणीवर बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आ
-
पेशावर - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका गावात कुटुंबियांच्या मर्जीनेच एका तरुणीवर बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण पंजाब प्रांतातील टोबा टेक सिंग शहरात 21 मार्च रोजी घडला असून नुकताच समोर आला. आपल्याच कुटुंबातील मुलीवर दुसऱ्याने बलात्कार करायचा हा निर्णय गावातील 12 लोकांनी चर्चा करून घेतला. दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने झालेल्या या कृत्याला पाकिस्तानात 'न्याय' म्हटले जात आहे.
काय आहे प्रकरण?
- 20 मार्च 2018 रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका तरुणीवर बलात्कार घडला. ज्या नराधमाने हा बलात्कार केला त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली.
- यानंतर बलात्काऱ्याचे कुटुंबीय माफी मागण्यासाठी पीडितेच्या घरी पोहोचले. त्यांनी माफी मागितली. पीडितेच्या कुटुंबियांनी माफ करण्यासाठी एक धक्कादायक अट ठेवली.
- आम्ही तुमच्या मुलाला माफ करू पण त्यासाठी आम्हाला बलात्काराच्या बदल्यात बलात्कार करायचा आहे असे पीडितेच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले.
- यानंतर गावातील पंच आणि दोन्ही कुटुंबियांमध्ये त्याच संध्याकाळी एक चर्चा झाली. त्या चर्चेत दोन्ही कुटुंबियांच्या मर्जीने धक्कादायक करार झाला.
- पीडितेच्या घरातील व्यक्तीने बलात्काऱ्याच्या बहिणीवर रेप करायचे असे संमतीने ठरवण्यात आले. रेपच्या घटनेच्या 24 तासांत आरोपीच्या बहिणीवर बलात्कार करण्यात आला.पुढील स्लाइड्सवर वाचा, यापूर्वीही घडले असे प्रकार, बदल घेण्यासाठी गँगरेप...
-
जुलै 2017 मध्ये अशाच प्रकारची एक घटना पाकिस्तानच्या मुल्तान येथे घडली होती. त्यात 16 वर्षीय मुलाने 13 वर्षीय मुलीवर रेप केला होता. पीडित मुलगी त्याच्या शेजारीच राहत होती. यानंतर पंचायतीने पीडितेच्या भावाला आरोपीच्या बहिणीवर बलात्कार करण्याचा निकाल दिला. दुसरी पीडित 17 वर्षांची होती. दोन्ही कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला होता.
-
यासोबतच 2014 मध्ये पाकिस्तानात पुरुषाचे आपल्याच गावातील महिलेसोबत अफेअर असल्याचे उघड झाले होते. दोन्ही परिवारांमध्ये भांडण झाले. प्रकरण पंचायतीकडे पोहोचले. तेव्हा पंचायतीने त्या पुरुषाच्या 45 वर्षीय विधवा बहिणीवर सामुहिक बलात्काराचा निर्णय घेतला. त्यानंतर 3 जणांना त्या महिलेवर गँगरेप केला होता.