Home | International | Pakistan | Sharif Flips Statement On Mumbai Attack, Says Indian Media Grossly Misinterpreted His Remarks

मुंबई हल्ल्यावर विधान करून नवाज शरीफांचा घुमजाव, लष्कराने बोलावली तातडीची बैठक

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 14, 2018, 11:54 AM IST

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुंबई हल्ल्यासंदर्भात कबुली दिल्याच्या 2 दिवसांनंतर घुमजाव केला आहे.

 • Sharif Flips Statement On Mumbai Attack, Says Indian Media Grossly Misinterpreted His Remarks

  इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुंबई हल्ल्यासंदर्भात कबुली दिल्याच्या 2 दिवसांनंतर घुमजाव केला आहे. शरीफांनी 12 मे रोजी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मुंबई हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता अशी कबुली दिली होती. "आम्ही दहशतवाद्यांना सीमेपलिकडे जाऊ द्यायचं का? 150 जणांचा बळी घेऊ द्यायचं का?" एवढेच नव्हे, तर पाकिस्तानात 3-3 समांतर सरकार चालतात असेही ते म्हणाले होते. या वक्तव्याची पाकिस्तानच्या लष्कराने गंभीर दखल घेतली. तसेच सोमवारी या प्रकरणी तातडीची बैठक बोलावली आहे.

  26 नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्यात 10 दहशतवाद्यांनी 166 जणांचा जीव घेतला. त्यापैकी 9 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. तर एकमेव दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आले होते. नंतर त्याला सुद्धा फाशी देण्यात आली. पाकिस्तानने तो आपला नागरिक असल्याचे शेवटपर्यंत मान्य केले नव्हते.


  भारतीय मीडियाने चुकीचा अर्थ काढला - शरीफ
  - शरीफ यांच्या प्रवक्त्याने म्हटले, "नवाज शरीफ यांच्या मुंबई हल्ल्यावर दिलेल्या वक्तव्याला भारतीय मीडियाने अतिश्योक्तीने सादर केले आहे. पाकिस्तानात सुद्धा इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावर त्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ दुसराच होता. पण, कुणीही सत्य दाखवले नाही."
  - "पीएमएल-एन देशातील एक प्रमुख राजकीय पक्ष असून नवाज शरीफ एक मोठे नेते आहेत. त्यांना आपल्या क्षमता आणि कटिबद्धतांची जाणीव आहे. यासंदर्भात काही प्रमाणपत्र वाटण्याची गरज नाही. नवाज शरीफ यांनी पंतप्रधान असताना पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी कठोर आणि महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच, मे 1998 मध्ये पाकिस्तानने आण्विक चाचणी घेतली."


  पाक आर्मीने बोलावली उच्चस्तरीय बैठक
  - नवाज शरीफ यांच्या वक्तव्याने पाकिस्तानच्या लष्करात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी लष्कराने यासंदर्भात तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
  - आर्मी प्रवक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे, पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी नॅशनल सिक्युरिटी कमिटीची बैठक बोलावण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार, लष्काराने ही उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

 • Sharif Flips Statement On Mumbai Attack, Says Indian Media Grossly Misinterpreted His Remarks

Trending